Grand Wedding : जमीन, फॅक्टरी आणि... पित्याने मुलीच्या लग्नात इतकं दिलं की मुलाच्या सात पिढ्या बसून खातील
लग्नात हुंडा देणं कायद्याने गुन्हा आहे. पण राजस्थानमध्ये एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नात तिच्या नवऱ्याला इतकं गिफ्ट केलं की त्याच्या सात पिढ्या बसून खातील, लग्न इतं भव्य-दिव्य होतं की देशभरात या ग्रँड वेडिंगची चर्चा झाली.
Rajasthan Royal Wedding: आपल्या मुलीचं लग्न (Daughter Wedding) चांगल्या घरात व्हावं, तीने राजेशाही थाटात (Grand Wedding) राहावं अशी इच्छा प्रत्येक बापाची असते. यासाठी वडिल प्रत्येक गोष्ट करण्यास तयार असतो. पण राजस्थानमधल्या (Rajasthan) एका अति श्रीमंत व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नात इतका खर्च केला की संपूर्ण देशभरात या लग्नाची चर्चा आहे. राजस्थानमधल्या पाली जिल्ह्यातल्या जैतारण इथल्या मोहराई गावात फेब्रुवारी महिन्यात हा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नमंडप आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठीचा शाही थाट पाहून बडे-बडे उद्योगपतीदेखील कमी पडतील.
लग्नाचा शाही थाट
मुलीला घरापासून लग्नमंडपापर्यंत पोहोचण्यासाठी विटेंज कार, उंट, बैलगाडीची व्यवस्था करण्यात आली होती. बीकानेरच्या या उद्योजकाने (Businessman)आपल्या मुलीला स्त्रीधन म्हणून 2 किलो सोन्याचे दागिने, 100 किली चांदीचे दागिने, सर्व प्रकारचं फर्निचर, सर्व प्रकारची भांडी, एसयूवी कार आणि एक अलिशान बंगला भेट दिला.
बंगळुरुमध्ये प्रॉपर्टीच्या व्यवसाय करणारे उद्योजक महेंद्र सिंह सेवड यांची मुलगी वंशिकाचा नुकसाच विवाह सोहळा पार पडला. महेंद्र सिंह यांच्या मोहराई गावापासून पाच किलोमीटर अंतरावर विवाहाचं ठिकाण होतं. इथं वऱ्हाडींच्या राहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. महेंद्र सिंह यांचा बंगळुरुत प्रॉपर्टी बिझनेसबरोबरच पाइपचा बिझनेसही आहे. ते राजस्थानमधल्या आपल्या वडिलोपार्जित बंगल्यात राहातात. आपल्या मुलीचं लग्न शाही थाटात पार पडावं अशी महेंद्र सिंह यांची इच्छ होती. यासंदर्भात त्यांनी आपल्या कुटुंबाशीही चर्चा केली.
वंशिकाच्या लग्नाची चर्चा
महेंद्र सिंह यांची मुलगी वंशिका हिचा विवाह पहचाना गावातील उद्योगपती कुलदीप सिंह जागरवाल यांच्याशी ठरला. मुला-मुलीने एकामेकांना पसंत केल्यानंतर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. मुलीच्या लग्नाची शाही व्यवस्था करण्यात आली होती. पण चर्चा झाली ती महेंद्र सिंह यांनी आपल्या जावयाला दिलल्या गिफ्टची. महेंद्र सिंग यांनी जावयाला चांदीची भांडी, चांदीचा पलंग, सोफा सेट, डायनिंग टेबल इत्यादी घरगुती गोष्टी दिल्या. हे कमी की काय करोडो रुपयांच्या आणखी भेटवस्तूही दिल्या आहेत. ज्याची जिल्ह्याबरोबरच संपूर्ण देशभरात चर्चा आहे.
मुलाच्या सात पिढ्य बसून खातील
मुलीच्या पाठवणीच्या वेळी महेंद्र सिंह यांनी लाखो रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला. याशिवाय मुलीला लाखो रुपायंचे दागिने भेट दिले. जावयाला एक SUV700 कार, स्कूटी, बंगुळुरमध्ये 12000 स्क्वेअर फूटाची फॅकट्री, 30X40 चा प्लॉट, पाली हाऊसिंग बोर्ड इथं 2 एकर जमीन, इतकंच काय तर बँकत एक कोटी 8 लाखांची ए़फडीही भेट दिली.