चेन्नई : अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.


बस कंटक्टर ते राजकारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत यांनी अतिशय संघर्ष करुन आज इतक्या मोठ्या स्थानावर पोहोचले आहेत. एका सामान्य व्यक्तीपासून ते एक राजकारणी असा प्रवास त्यांनी केला. रजनीकांत यांचे सुरुवातीचे जीवन खूप संघर्षपूर्ण आहे. त्यांनी कुली, बस कंडक्टर या सारख्या छोट्या छोट्या गोष्टी देखील केला. रजनीकांत यांना अभिनयाची त्यांच्या बालपणापासून आवड होती. परंतु पैशांच्या अभावामुळे त्यांना नोकरी करावी लागली. नंतर त्यांनी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश केला आणि तिथून एक सिने जगतातला प्रवास सुरू केला. रजनीकांत तमिळ आणि हिंदी चित्रपट अभिनेते आहेत.


दक्षिण भारतातला देव


दक्षिण भारतात देवा सारखी आज त्यांचे चाहते त्यांची पूजा करतात. अभिनेता म्हणून, त्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळवले आहेत. अपूर्व रागडगल (1975) या चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक के. बालचंद्र होते ज्यांना रजनीकांत गुरु मानतात. पण बालचंद्र म्हणतात की, 'मी रजनीकांतला नाही बनवलं. त्याने स्वत:ला वेळेनुसार घडवलं आहे. त्याने त्याचं कौशल्य दाखवलं. मी फक्त जगासमोर त्याला ठेवलं पण त्याने जग जिंकलं.'


मराठी कुटुंबात जन्म


रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरू येथील एका मराठा हेंद्रे पाटील कुटुंबात झाला. त्यांचे संपूर्ण नाव शिवाजीराव गायकवाड आहे. पिता रामजीराव आणि आईचे नाव जिजाबाई गायकवाड आहे. रजनीकांत यांनी लता रंगचारीसोबत 26 फेब्रुवारी 1981 ला तिरुपतीमध्ये विवाह केला. रजनीकांत यांना २ मुली आहेत.