त्याच्यात पोलीस चौकीला आग लावण्याची हिम्मत आली, पण पत्नीचा छळ सहन करण्याची नाही
पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या पतीने थेट पोलीस चौकीलाच आग लावली
राजकोट : पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या एका पतीने चक्क पोलीस स्टेशनलाच आग लावली. गुजरातमधल्या राजकोट इथं ही घटना घडली आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने राजकोट शहरातील जामनगर रोडवरील बजरंग वाडी पोलीस चौकीला आग लावली आणि आग लागल्यानंतरही पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहिला.
पोलीस चौकीला आग लावणाऱ्या या व्यक्तीचे नाव देवजी उर्फ देव चावडा आहे. अटकेनंतर देवो चावडा यांनी सांगितले आर्थिक परिस्थिती आणि घरगुती भांडणामुळे गेल्या काही दिवसांपासून पत्नीबरोबर वारंवार वाद होत होता. सततच्य वादाला तो कंटाळला होता. आरोपी देवजीने सांगितलं की तो पत्नीला कंटाळला होता, आणि यातून सुटण्यासाठी त्याला दिर्घ काळासाठी जेलमध्ये जायचं होतं. आणि त्यामुळेच त्याने पोलीस चौकीला आग लावली.
देवजीने सांगितलेल्या कारणामुळे पोलीसही चक्रावले. सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केल्याप्रकरणी देवजीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कमीतकमी दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.