नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह 7 जूनला 2 दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. 7 आणि 8 जूनला ते खोऱ्यात शांती प्रक्रियेला प्रोत्साहन देतील. त्यानंतर ते सुरक्षा व्यवस्थेचा आढाव घेतील. त्यानंतर राजनाथ सिंह मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्यासह राज्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी 7 जूनला गृहमंत्री श्रीनगरला पोहोचतील. तेथून ते कुपवाडा येथे जातील. तेथील विकास कामांचा आढावा घेत ते स्थानिक लोकांची भेट घेतील. त्यानंतर पुन्हा श्रीनगरला येतील. येथे ते मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्यासोबत स्पोर्ट्स कॉउंसिलच्या कार्यक्रमात भाग घेतील. राज्यातील खेळाडूंना ते सन्मानित करतील. यानंतर राज्यातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा होईल. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या निधीअंतर्गत करण्यात आलेल्या कामाचा आढावा ते घेतील. अमरनाथ यात्रा आणि सुरक्षे व्यवस्थेचा ते आढावा घेतील. मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या इफ्तार पार्टीमध्ये देखील ते सहभागी होतील. 


दूसऱ्या दिवशी ते पुन्हा जम्मूला रवाना होतील. रोहंग्या मुस्लील, सीमेवरची स्थिती, बंकर बनवण्याची योजना याचा ते आढावा घेतील.