CM योगींच्या खांद्यावर हात ठेवून PM मोदी काय म्हणाले?
फोटो पाहून अनेक जणांना प्रश्न पडला होता, आता संरक्षण मंत्र राजनाथ सिंह यांनी यावरचं उत्तर दिलं आहे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांचे दोन फोटो गेल्या काहि दिवसात सोशल मीडियावर प्रचंड गाजत होते. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी योगींच्या खांद्यावर हात ठेवून काही तरी सांगताना दिसत आहेत. फोटो पाहून अनेक जणांना प्रश्न पडला होता की, पंतप्रधानांनी मुख्यमंत्री योगींना नेमकं काय सांगितलं असेल. आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
पंतप्रधानांनी काय सांगतिलं योगींना
सीतापूरमध्ये बूथ अध्यक्षांच्या अधिवेशनाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) संबोधित करत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवून चालत असल्याच्या व्हायरल फोटोचा संदर्भ देत ते म्हणाले, 'पंतप्रधान योगींना सांगत असावेत की योगीजी असंच चांगलं आणि आक्रमक काम करत राहा, भाजपचा विजय निश्चित आहे.
कृषी कायदे का मागे घेतले?
यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवे कृषी कायदे का मागे घेतलं याचंही कारण सांगितलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले, कारण भाजप शेतकऱ्यांप्रती अत्यंत संवेदनशील आहे. आमचा पक्ष शेतकऱ्यांविषयी नेहमीच संवेदनशील राहिला आहे, त्यामुळे पंतप्रधानांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. आमचा पक्ष काँग्रेस आणि समाजवादी पक्षासारख्या शेतकरी आणि रामभक्तांवर कधीही गोळीबार करू शकत नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले.
भाजप जे बोलंत ते करतं
राजनाथ सिंह म्हणाले, भाजपला केवळ सत्तेसाठी नाही तर देशासाठी सरकार बनवायचं आहे. तुमच्यासारख्या समर्पित कार्यकर्त्यांमुळे आमचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आमचा पक्ष इतर राजकीय पक्षांप्रमाणे खोटी आश्वासने देत नाही, आमचा निवडणूक जाहीरनामाही खोट्या दाव्यांपासून दूर आहे. म्हणूनच मी म्हणतो की भाजप 'जे सांगतो तेच करतो.'