नवी दिल्ली : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत.  दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुक आयोगाने पाली सीटच्या रिटर्निंग अधिकाऱ्याला हटविण्याचे आदेश दिले आहेत. भाजपाच्या एका उमेदवाराच्या घरी ईव्हीएम सापडल्याच्या आरोपानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. एक सेक्टर अधिकारी ईव्हीएम मशिन घेऊन भाजपा उमेदवाराच्या घरी गेला होता असे म्हटले जात आहे. यानंतर सेक्टर अधिकाऱ्याला हटविण्यात आलं असून संबधित ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने पालीच्या रिटर्निंग अधिकारी महावीरला हटविण्याचे आदेशही दिले आहेत. यासोबतच जोधपुरच्या राकेश यांना कार्यभार संभाळण्याचे आदेश दिले आहेत. भाजपा उमेदवाराच्या घरी इलेक्र्टॉनिक वोटींग मशिन ठेणअयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे.


राजस्थानमध्ये 74 टक्के मतदान 


राजस्थान विधानसभेसाठी शुक्रवारी 74 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. दोन-तीन घटना सोडल्या तर मतदान पूर्णपणे शांतिपूर्ण राहिलं. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी 75.23 टक्के मतदान झाल होत. त्या तुलनेत यावर्षीचे मतदान कमी झाल्याचे दिसून आले.