Rajsthan Accident : अनेक जण नवीन वर्षाची सुरुवात ही देव दर्शनाने करतात. अशाच प्रकारे राजस्थानातील(Rajsthan ) एक कुटुंब नव वर्षाच्या निमित्ताने कुल देवीच्या दर्शनासाठी गेले होते. मात्र, देव दर्शनावरुन परत येत असताना अत्यंत भयानक घटना घडली. कुलदेवीच्या दर्शनानंतर यांचा घात झाला आहे. वाटेतच भयानक दुर्घटना घडली. कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 8 जणांचा भयानक मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळला आहे. नविन वर्षाच्या दिवशी या सर्वांनी देवीकडे सुखी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली होती. मात्र, वाटेतच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भीषण अपघातात दोघा सख्ख्या भावांचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांमध्ये एका गावातील 9 जणांचा समावेश आहे. यात एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. एकाच वेळी घरातून आठ जणांची प्रेतयात्रा निघाली. 


मृत हे सामोद, जयपूर येथील रहिवासी आहेत.  कैलाशचंद आणि सुवालाल या दोघा भावांचे कुटुंब 1 जानेवारी रोजी कुलदेवी असलेल्या जीन मातेच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर घरी परत येत असताना खंडेला-पलसाणा रस्त्यावर त्यांच्या वाहनाने प्रथम दुचाकीला आणि नंतर ट्रकला धडक दिली.  या भीषण अपघातात होत्याचं नव्हतं झाल. 


या अपघातात कैलाशचंद यांची दोन मुले विजय व अजय यांच्यासह मुलगी रेखा, विजयची पत्नी राधा, सुवालाल यांच्या दोन सूना पूनम आणि अनुराधा, नातू आरव व नात निक्कू, शेजारी अरविंद यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर सोमवारी सर्व मृतदेह एकत्र गावात आल्यावर गावात एकच खळबळ उडाली. गावात कुणाच्याही घरी चुल पेटली. बारा जणांचे मृतदेह गावात आल्याबरोबर ग्रामस्थांनी एकच टाहो फोडला. एकाच चितेवर घरातील आठ मृदेह रचण्यात आले. या कुटुंबातील चार वर्षाच्या मुलाने या आठही जणांना मुखाग्नी दिला. हे दृष्य पाहून अत्यंविधीसाठी उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच काळजाचे पाणी पाणी झाले.