राजस्थान पोटनिवडणुकीत भाजप पिछाडीवर, काँग्रेसची जोरदार मुसंडी
राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. निकालाचे कल हाती येत आहेत.
जयपूर / कोलकाता : राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. निकालाचे कल हाती येत आहेत. अजमेर आणि अलवर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. तर मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला मागे टाकले आहे. दरम्यान, राज्यस्थानमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आहे. हा भाजपला जोरदार धक्का आहे.
या ठिकाणी पोटनिवडणूक
भाजप खासदार प्रा. सांवर लाल जाट (अजमेर), खासदार चांद नाथ योगी (अलवर) आणि आमदार कीर्ति कुमारी (मांडलगढ) यांच्या निधनानंतर या तीन ठिकाणी पोट निवडणूक झाली. आज मतमोजणी सुरु झाली. राज्यस्थानमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या गोठात चिंता आहे. दरम्यान, काँग्रेसने म्हटलेय, ही निवडणूक आम्ही जिंकणार. जर काँग्रेसने ही निवडणूक जिंकली तर भाजपला हा मोठा धक्का असेल.
यांच्यात चुरशीची लढत
अलवर लोकसभा मतदार संघातून भाजपचे जवंसत सिंग यादव विरुद्ध काँग्रेसचे डॉ. करण सिंग यादव तर अजमेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रधु शर्मा विरुद्ध भाजपचे रामस्वरुप लांबा अशी लढत होत आहे. तर मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपचे शक्ति सिंग हाडा विरुद्ध काँग्रेसचे विवेक धाकड यांच्यात लढत होत आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची आघाडी
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये उलुबेरिया लोकसभा आणि नवपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नवपाडामधून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे.