...तरी येणार तर मोदीच! थेट राज्यसभेतून अमित शाहांचा INDIA ला इशारा; Video केला शेअर
Amit Shah Delhi services Bill Rajya Sabha Speech: अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये दिल्ली सेवा विधेयक मांडताना विरोधकांवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्याचं पहायला मिळालं. या विधेयकावर 8 तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यानच्या भाषणात अमित शाहांनी `इंडिया` गटालाही लक्ष्य केलं.
Amit Shah Delhi services Bill Rajya Sabha Speech: दिल्लीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या व अन्य सेवांच्या निर्णयाचे अधिकार केंद्र सरकारकडे देणारे दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर झालं आहे. 131 विरुद्ध 102 मतांनी हे विधेयक मंजूर झालं. या विध्येकाच्या निमित्ताने संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील शक्तीप्रदर्शनामध्ये भारतीय जनता पार्टीप्रणीत 'एनडीए'ने विरोधकांच्या 'इंडिया' महाआघाडीवर मात केल्याचं पहायला मिळालं. हे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये मांडलं. यावेळे त्यांनी 'इंडिया' या विरोधकांच्या आघाडीला लक्ष्य केलं.
अमित शाहांचा हल्लाबोल
आपल्या भाषणामध्ये अमित शाह यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. या विधेयकाचा उद्देश भ्रष्टाचारमुक्त शासन निर्माण करण्याचा आहे. या विधेयकामधील एकही तरतूद अशी नाही की ज्यामुळे आधीच्या व्यवस्थेला काहीही धक्का लागेल. हे विधेयक कोणत्याही पंतप्रधानांना वाचवण्यासाठी नसल्याचा टोलाही विरोधकांना लगावला. तसेच काँग्रेसला लोकशाहीबद्दल बोलण्याचा हक्क नाही. आपच्या मांडीवर बसलेल्या काँग्रेसनेच आधी हे विधेयक आणलं होती अशी आठवणही शाह यांनी भाषणादरम्यान करु दिली.
येणार तर मोदीच
आपल्या भाषणादरम्यान शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधताना, तुम्ही काहीही केलं तरी 2024 ला मोदीच पंतप्रधान होणार असं थेट आव्हान दिलं. "हे सर्वजण एकत्र का आले आहेत? हे एकत्र आले आहेत कारण त्यांना विश्वास आहे की एकट्याने काही होणार नाही. एकत्र आले तर काहीतरी करु शकतो असं त्यांना वाटतंय. मात्र मी आज सांगू इच्छितो की अजून 5-10 लोकांना तुमच्यात घेतलं तरी काहीच होणार नाही. मे 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत," असं अमित शाह म्हणाले. "विपक्ष चाहे तो और 4-5 साथियों को जोड़ ले, लेकिन 2024 में आयेंगे तो मोदी जी ही…" अशा कॅप्शनसहीत आपल्या भाषणातील व्हिडीओ क्लिप अमित शाहांनी ट्वीटरवरुन शेअर केली आहे.
विरोधकांची हवी तेवढी मतं पडली नाही
राज्यसभेमध्ये 8 तासांच्या चर्चेनंतर विधेयकावर मतदान घेण्यासाठी विऱोदकांनी मतविभागणीची मागणी केली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा बिघडल्याचं उपसभापतींनी जाहीर केलं. त्यानंतर मतपत्रिकेद्वारे मतविभागी घेण्यात आली. राज्यसभेमध्ये 238 सदस्य असून 5 जागा रिक्त आहेत. एकूण 233 सदस्यांनी मतदानामध्ये सहभाग घेतला. भाजपासहीत एनडीएमधील संख्याबळ हे 111 होतं. बिजू जनता दल आणि व्हायएसआर काँग्रेसच्या प्रत्येकी 9 सदस्यांनी या विधेयकाला ठरल्याप्रमाणे पाठिंबा देत मतदान केलं. तसेच तेलगु देसम व जनता दल यांचं प्रत्येकी एक मत विध्येकाच्या बाजूने पडल्याने 131 मतं पडली. विरोधकांच्या 'इंडिया' गटाकडे 97 मतं होती. सगळी जुळवाजुळव करुन विरोधात 106 मतं पडतील असं मानलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात केवळ 102 मतं पडली.