नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी आज निवडणूक होणार असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे हरिवंश नारायण आणि विरोधकांनी पाठिंबा दिलेले काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद यांच्यात ही लढत रंगणार आहे. सकाळी ११ वाजता मतदानाला सुरूवात होईल. काँग्रेसचे के पी जे कुरियन १ जुलैला सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त आहे. सध्या राज्यसभेत २४४ सदस्य असून बहुमतासाठी १२३ मतांची गरज आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी निवडणुकीत विजय मिळेल असा दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने राज्यसभेच्या सर्व खासदारांना निवडणुकीसाठी उपस्थित राहण्याचा आणि एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हिप जारी केला आहे.




एनडीएचे उमेदवार हरिवंश यांनी राज्यसभा उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करताना एनडीएचे सर्व नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेतेही यावेली उपस्थित होते. एनडीएच्या हरिवंश यांचं पारड सध्या तरी जड आहे. राज्यसभेत एनडीएचे संख्याबळ 116 आहे. बीजेडीने पाठिंबा दिल्यानंतर ते 123 पर्यंत जाईल. पण एनडीएच्या उमेदवाराला 125 ते 128 मते मिळावी यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. काँग्रेस आणि मित्रपक्षांकडे 118 जणांचा पाठिंबा आहे.