नवी दिल्ली : सहा राज्यांच्या २५ राज्यसभा जागांसाठी सकाळी ९ वाजल्यापासून मतदान सुरू झालंय. या जागांमध्ये उत्तरप्रदेशच्या १० जागांचाही समावेश आहे. हे मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहील. 


उत्तरप्रदेशची निवडणूक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरप्रदेशच्या राज्यसभेच्या प्रत्येक जागेसाठी ३७ आमदार मतदान आवश्यक असतं. विधानसभेच्या ४०३ जागांपैंकी भाजपकडे ३११ जागा आहेत. अशावेळी भाजपचा ८ जागांवर विजय पक्का मानला जातोय. 


समाजवादी पार्टीकडे ४७ जागा आहेत. अशावेळी त्यांना केवळ एक सदस्य राज्यसभेला पाठवण्याची संधी मिळेल. काँग्रेसकडे सध्या ७ जागा आहेत. काँग्रेस आणि बहुजन समाजवादी पार्टी एकत्र आल्यानंतरही आपला एक उमेदवार निवडणून आणण्यात अपयशी ठरतील, अशी चिन्हं आहेत. यासाठी त्यांना सपाची मदत घ्यावी लागेल. परंतु, सपानं मात्र समर्थन देण्यास अगोदरच सांगितलंय. परंतु, सपाचे बंडखघोर बीएसपी-सपाच्या जोडगोळीला नुकसान पोहचवू शकतात.


निवडणुकांचं समीकरण पाहता इथं 'क्रॉस वोटिंग' होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे विरोधकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. उत्तरप्रदेशात राज्यसभेच्या १० जागांसाठी भाजपकडून उमेदवार उभे करण्यात आल्यानं ही निवडणूक अधिक रंजक झालीय. 


केरळमध्ये काय?


केरळहून जदयूचे राज्यसभा सदस्य एम पी वीरेंद्र कुमार यांच्या राजीनाम्यानं रिकाम्या झालेल्या जागेवर आज उप-निवडणूक होणार आहे. यापूर्वी राज्यसभेच्या उरलेल्या ३३ जागांवर एकच उमेदवार असल्यानं त्यांची १५ मार्च रोजी निर्विरोध निवड करण्यात आलीय. 


यूपी १०, बिहार ६, महाराष्ट्राचे ६, पश्चिम बंगालचे ५, मध्यप्रदेशचे ५, गुजरातचे ४, कर्नाटकचे ४, आंध्रप्रदेशचे ३, राजस्थानचे ३, ओडिशाचे ३, तेलंगानाचे ३, झारखंडचे २ तर उत्तराखंड, छत्तीसगड, हिमाचल, हरियाणा, केरळच्या एका-एका जागेवर मतदान होणार आहे.