Sonia Gandhi News: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांनी यांनी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election 2024) लढवणार आहेत. बुधवारी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राहुल आणि प्रियंका यांच्याबरोबर जयपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. जवळपास अडीच दशकांनंतर सोनिया गांधी या पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवणार नाहीएत. सोनिया यांच्याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) या देखील राज्यसभेच्या सदस्या राहल्या होत्या. जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं. रायबरेलीतून लोकसभा निवडणूक जिंकण्याआधी 1964 ते 1967 दरम्यान इंदिरा गांधी या राज्यसभेच्या सदस्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस सध्या आपल्या कठिण काळातून जात आहे. कठिण काळात गांधी कुटुंबाला दक्षिणेतील राज्यांनी हात दिला आहे. पण यावेळी सोनिया गांधी यांनी मतदार संघ बदलला आहे. पण यामागे कारण काय आहे?


गांधी कुटुंबाचं दक्षिण कनेक्शन
आणीबाणीनंतर 1978 मध्ये इंदिरा गांधी यांनी कर्नाटकच्या चिक्कमंगलुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी जनता पार्टीच्या वीरेंद्र पाटील यांचा पराभव केला. 1980 मध्ये इंदिरा गांधी यांनी रायबरेली आणि आंध्रप्रदेशच्या मेदक मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवर त्या जिंकून आल्या. 


राजीव गांधी यांच्या निधनांतर काँग्रेसची अवस्था बिकट झाली. यावेळी राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी राजकीय मैदानात उतरल्या. 1999 मध्ये आपली राजकीय कारकिर्द सुरु करण्यासाठी सोनिया गांधी यांनी कर्नाटकची निवड केली. कर्नाटकमधल्या वेल्लोर आणि अमेटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच सोनिया गांधी दोनही जागांवर जिंकून आल्या. पण खासदार म्हणून त्यांनी अमेठिला पसंती दिली. 2004 मध्ये सोनिया गांधी यांनी मुलगा राहुल गांधी यांच्यासाठी अमेठीचा मतदारसंघ सोडला आणि रायबरेलीतून निवडणूक लढवली. 


आता 2004 पासून त्या रायबरेलीच्या खासदार आहेत. 


आता राजस्थान का?
सोनिया गांधी या पहिल्यांदा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. आणि यासाठी त्यांनी राजस्थानची (Rajasthan) निवड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलगी प्रियंका गांधी-वाड्रा हिच्यासाठी सोनिया गांधी यांनी रायबरेलीची जागा सोडली आहे. राज्यसभेसाठी राजस्थानमधून काँग्रेसने तीन उमेदवारींची घोषणा केली आहे. यापैकी सोनिया गांधी एक आहेत. काँग्रेसने विचारपूर्वक सोनिया गांधी यांच्यासाठी राजस्थानची निवड केली आहे.