TATA ग्रुपचा हा शेअर्स एका महिन्यात देणार बक्कळ कमाई, राकेश झुनझुनवालांचीही पसंती
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चच्या मते, टाटा मोटर्स ऑटो शेअर्समध्ये आउटपरफॉर्मर आहे. येथून पुढेदेखील शेअर दमदार कामगिरी करू शकतो.
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चच्या मते, टाटा मोटर्स ऑटो शेअर्समध्ये आउटपरफॉर्मर आहे. येथून पुढेदेखील शेअर दमदार कामगिरी करू शकतो.
मुंबई : टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चने तांत्रिक निरीक्षणाच्या आधारे या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्येदेखील टाटा मोटर्स (Tata motors)चाही समावेश आहे. सप्टेंबर तिमाहीत त्यांची टाटा मोटर्समध्ये 1.1 टक्के हिस्सेदारी आहे.
टाटा मोटर्स: 15% परतावा अपेक्षित
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चने तांत्रिक निरीक्षणाच्या आधारे टाटा मोटर्सला 'बाय' रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज फर्मने 570 रुपये लक्ष किंमत दिली आहे.
यामध्ये खरेदीची रेंज 515-523 रुपये ठेवण्यात आली असून स्टॉप लॉस ४८८ रुपये आहे. ब्रोकरेज फर्मने 30 दिवसांसाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. 22 नोव्हेंबर रोजी गुंतवणूकदारांना सध्याच्या 486 रुपयांच्या किंमतीवरून 14.33 टक्के परतावा मिळू शकतो.