Rakesh Jhunjhunwala आणि RK Damani `या` मोठ्या बँकेत करणार गुंतवणूक
बँकिंग क्षेत्रात मोठी डील होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि D-Mart चे संस्थापक RK दमानी यांनी RBL बँकेतील 10% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे
नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात मोठी डील होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि D-Mart चे संस्थापक RK दमानी यांनी RBL बँकेतील 10% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दोन्ही गुंतवणूकदारांनी याबाबत RBIशी चर्चा केली आहे. RBI सध्या झुनझुनवाला आणि दमानी यांच्या विनंतीवर विचार करत आहे. आरबीआयने ख्रिसमसच्या दिवशी मुंबईतील 78 वर्षे जुनी बँक असलेल्या आरबीएलमध्ये दोन मोठे बदल केले.
शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला आणि D-Mart चे संस्थापक RK दमानी यांनी RBL बँकेतील 10% हिस्सा खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. RBIने ख्रिसमसच्या दिवशी मुंबईच्या आरबीएलमध्ये दोन मोठे बदल केले आहेत.
बँकेच्या संचालक मंडळात बदल
25 डिसेंबर रोजी, RBI ने कम्युनिकेशन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांची बँकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर, बँकेने एक्सचेंजेसला कळवले की RBL बँकेचे एमडी आणि सीईओ विश्ववीर आहुजा तात्काळ रजेवर गेले आहेत.
तसेच कार्यकारी संचालक राजीव आहुजा यांना एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले.
RBL ने 25 डिसेंबर रोजी रेग्युलेटरी फायलिंगमध्ये माहिती दिली की, 25 वर्षांचा अनुभव असलेल्या दयाल यांची बोर्ड सदस्य म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयाचे ते स्वागत करते.