मुंबई : राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी गुंतवणूक केलेल्या नजारा टेक्नॉलॉजीज (Nazara Technologies)च्या नवीन फंडिंग राऊंडमधून 315 कोटी रुपये जमवले आहेत. कंपनीने स्टॉक मार्केटला पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये सांगितलं आहे की, कंपनीने शेअर बाजाराला पाठवलेल्या कागदपत्रात म्हटले आहे की, त्याने नवीन शेअर्सच्या प्राधान्य वाटपातून मार्की गुंतवणूकदारांकडून ही रक्कम उभी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्की गुंतवणूकदार असे कॉर्पोरेट किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार असतात, जे कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर यशाचा अंदाज लावतात. याअंतर्गत, कंपनी 2206 रुपये प्रति शेअरच्या किंमतीवर 14,29,266 इक्विटी शेअर्स जारी करेल. या शेअर्सची दर्शनी किंमत 4 रुपये असेल. सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या समभागांना जारी करण्याच्या तारखेपासून एक वर्षाचा लॉक-इन कालावधी असेल. म्हणजेच हे शेअर्सबाबत एका वर्षाच्या आत व्यवहार करता येत नाहीत.


सरकारने टेलिकॉम कंपनींकरता बँक गॅरंटीमध्ये 80% गोष्टी कमी केल्या 


कंपनीने म्हटले आहे की, नवीन निधी वापरून अनेक नवीन उपक्रम सुरू करेल. कंपनीच्या विविध व्यवसाय क्षेत्रांमध्ये धोरणात्मक अधिग्रहण करेल. हे व्यवसाय वर्टिकल हे गेमिफाईड लर्निंग, फ्रीमियम आणि कौशल्य आधारित रिअल मनी गेमिंग आणि एस्पोर्ट्स आहेत. नजारा ही एक भारतीय गेमिंग आणि स्पोर्टस मीडिया प्लॅटफॉर्म आहे. याचे भारतासोबतच अफ्रिका आणि नॉर्थ अमेरिकेत इमर्जिंग मार्केट आहेत.


झुनझुनवाला यांच्याकडे 10.82 टक्के हिस्सेदारी 


जून तिमाहीच्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदार राकेश झुंझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे 32,94,310 शेअर्स आहेत. हे कंपनीच्या एकूण जारी केलेल्या शेअर्सच्या सुमारे 10.82 टक्के आहे. नझारा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स बुधवारी NSE वर 5.43% वाढून 2,625.10 रुपयांवर बंद झाले.