कोटींच्या रिटर्न्सनंतर Rakesh Jhunjhunwala यांची या शेअरमधून Exit
Rakesh Jhunjhunwala Portfolio:डिसेंबर 2021 च्या तिमाहीसाठी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या होल्डिंग्सबाबत अपडेट्स समोर येत आहेत
मुंबई : Rakesh Jhunjhunwala Portfolio:डिसेंबर 2021 च्या तिमाहीसाठी शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या होल्डिंग्सबाबत अपडेट्स समोर येत आहेत. शेअर बाजारातील 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांनीही डिसेंबरच्या तिमाहीत आपला पोर्टफोलिओमध्ये काही बदल केले आहेत. झुनझुनवाला आपल्या पोर्टफोलिओमध्ये वेळोवेळी बाजारातील मूड आणि सेंटीमेंटनुसार काही बदल करत असतात. डिसेंबरच्या तिमाहीत, त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओतील महत्वाच्या स्टॉकमधील हिस्सा कमी केला. डिसेंबरच्या तिमाहीत त्यांनी Tarc Ltd या शेअरमधील गुंतवणूक कमी केली. टॉर्क लिमिटेड या 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्टॉकची कामगिरी गेल्या एका वर्षात चांगली राहिली आहे.
Tarc Ltd: शेअरमधील गुंतवणूक काढली
BSE च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या डिसेंबर 2021 (Q3FY22) तिमाहीसाठी Tarc Ltd च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला कंपनीतील गुंतवणूक जवळपास काढून घेतली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये, झुनझुनवाला यांच्याकडे टॉर्क लिमिटेडमधील 1.59% हिस्सा होता.
Tarc Ltd: 1 वर्षात पैसे दुप्पट
बांधकाम क्षेत्रातील कंपनी टॉर्क लिमिटेडच्या शेअर्सचा परतावा पाहिला तर गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 112 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. या दरम्यान, शेअरची किंमत 24.30 रुपये (7 जानेवारी 2021) वरून 51.65 रुपये (7 जानेवारी 2022) पर्यंत वाढलेली दिसली.
गेल्या 6 महिन्यांत शेअरमध्ये 33 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हा शेअर गेल्या 5 वर्षांच्या रिटर्न चार्टवर मल्टीबॅगर ठरला आहे. गेल्या 5 वर्षांत, शेअरमध्ये 133 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.