Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमधील हे जबरदस्त स्टॉक; 6 महिन्यात खेचला पैसाच पैसा
अनेक गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओप्रमाणेच आपल्या शेअरची खरेदी विक्री करीत असतात. त्यामुळे आज आम्ही त्यांच्या पोर्टफोलिओमधील काही दमदार शेअर्सची माहिती तुम्हाला देणार आहोत.
मुंबई : शेअर मार्केटचे बिग बुल म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलीओककडे गुंतवणूकदारांचे लक्ष असते. अनेक गुंतवणूकदार झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओप्रमाणेच आपल्या शेअरची खरेदी विक्री करीत असतात. त्यामुळे आज आम्ही त्यांच्या पोर्टफोलिओमधील काही दमदार शेअर्सची माहिती तुम्हाला देणार आहोत. ज्या शेअर्सने गेल्या 6 महिन्यात जबरदस्त रिटर्न दिला आहे.
इंडियन हॉटेल्स कंपनी
टाटा ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनीमध्ये झुनझुनवाला यांची 2.1 टक्के होल्डिंग आहे. ज्यांची 14 ऑक्टोबर 2021 ला वॅल्यू 574 कोटी रुपये आहे. गेल्या सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 129.31 टक्के रिटर्न दिला आहे.
डेल्टा कॉर्प लिमिटेड
डेल्टा कॉर्पमध्ये राकेश झुनझुनवाला यांची 7.5 टक्के होल्डिंग आहे. ज्यांची 14 ऑक्टोबर 2021 ला वॅल्यू 579.8 कोटी रुपये आहे. गेल्या 6 महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 90.55 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.
नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड
नजारा टेक्नॉलॉजीजमध्ये राकेश झुनझुनवाला यांची 10.8 टक्के होल्डिंग आहे. ज्यांची 14 ऑक्टोबर 2021 ला वॅल्यू 912 कोटी रुपये राहिली आहे. गेल्या 6 महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 73.21 टक्के रिटर्न दिला आहे.
टायटन कंपनी
टाटा ग्रुपची कंपनी टायटनमध्ये राकेश झुनझुनवाला यांची 4.8 टक्क्यांची होल्डिंग आहे. याची वॅल्यू 14 ऑक्टोबर 2021 ला 10 हजार 935 कोटी रुपये होती. गेल्या 6 महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 66.85 टक्के रिटर्न दिला आहे.
टाटा मोटर्स
टाटा ग्रुपच्या टाटा मोटर्समध्ये झुनझुनवाला यांची 1.1 टक्के होल्डिंग आहे. ज्याची 14 ऑक्टोबर 2021 ला वॅल्यू 1878 कोटी रुपये होती. गेल्या 6 महिन्यात या शेअरने 63.62 टक्के रिटर्न दिला आहे.