मुंबई  : शेअर बाजारात सध्या बरीच अस्थिरता सुरू आहे, ज्यामध्ये मार्केट एक्सपर्ट फक्त मजबूत फंडामेंटल्स असलेल्या दर्जेदार शेअर्समध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. योग्य सेक्टर आणि स्टॉक निवडणे आवश्यक आहे. जो येत्या काळात चांगला परतावा मिळवून देईल. असाच एक शेअर म्हणजे इंडियन हॉटेल्स कंपनी होय (IHCL).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही टाटा समूहाची कंपनी आहे. मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. ब्रोकरेज हाऊस निर्मल बंग यांनी स्टॉकमध्ये 40 टक्क्यांहून अधिक वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे आणि खरेदीचा सल्ला दिला आहे.


देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. लसीकरण वेगाने सुरू आहे, तर लग्न आणि सुट्टीचा हंगामामुळे हॉटेल क्षेत्रात बहार येऊ शकते.


43% परतावा 
ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, व्यवस्थापनाचे लक्ष  व्यवसाय वाढवण्यावर आहे. कंपनीचा ताळेबंद हळूहळू चांगला होत आहे.


सुट्ट्या आणि लग्नसराईचा हंगाम असल्याने हॉटेल रूम बुकींगही वाढणार आहे. ब्रोकरेज हाऊसने स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला असून त्याचे लक्ष 294 रुपये ठेवले आहे.


सध्याच्या 207 रुपयांच्या किंमतीनुसार ते 43 टक्के परतावा देऊ शकते.


राकेश झुनझुनवाला यांचा वाटा किती?
सध्याच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांची इंडियन हॉटेल्समध्ये 2.1 टक्के हिस्सेदारी आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे एकूण 25,010,000 शेअर्स आहेत. 


1 वर्षातील स्टॉकचा परतावा 93 टक्क्यांच्या जवळपास आहे. यादरम्यान शेअरचा भाव 107 रुपयांवरून 207 रुपयांपर्यंत वाढला.