Jhunjhunwala Portfolio: झुनझुनवाला यांनी खरेदी केल्यावर `या` शेअरमध्ये पाच दिवसांत 5% वाढ
गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी
मुंबई : Jhunjhunwala Portfolio: गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीने गेल्या आठवड्यात रेडिओफार्मा मॅन्यूफ्रॅक्चरर जुबिलँट फार्मोवामध्ये खुल्या मार्केटमार्फत गुंतवणूक केली आहे. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत याचे शेअर्स बीएसईवर 5.13 टक्क्यांनी वाढले आहे. तसेच इंट्रा डेमध्ये या शेअरमध्ये 2.3 टक्के वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला यांनी 594.35 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या भावाने 25 लाख आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी 20 लाख शेअर खरेदी केली.
एनएसईवर प्रकाशित बल्क डील्स डेटाच्या माहितीनुसार, झुनझुनवाला यांची कंपनी रेअर एंटरप्राइजेसने याच भावावर 40.25 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली. जून 2021 मध्ये शेअर होल्डिंग पॅटर्नच्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नीकडे या कंपनीत 6.29 टक्के हिस्सेदारी आहे. एक्सपर्टचं म्हणणं आहे की, यामध्ये गुंतवणूकदार 34 टक्के नफा मिळवू शकतो.
34 टक्के नफ्यासोबत गोल्डन चान्स
डोमेस्टिक रिसर्च व ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्ट रिसर्चने या स्टॉक करता 850 रुपयांचं टारगेट प्राइज सेट केलं आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना 34 टक्के फायदा होऊ शकतो. आता हा स्टॉक 634 रुपयांवर आहे. जून 2016 मध्ये याचा भाव 314 रुपये प्रति शेअर होते. जून 2021 मध्ये याचा दर 732 रुपये आहे. ब्रोकरेज फर्मने रेगुलेटरी कंसर्स व्यतिरिक्त स्टॉक ला 'Buy' चे रेटिंग दिले आहे.
पुढील तीन वर्षांकरता कंपनीला 3600 करोडोंची ऑर्डर
जुबिलँट फार्मोवाने कोविड ट्रिटमेंट आणि व्हॅक्सीनबाबत एक काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग डिल्स केलं आहे. ज्यामुळे त्याच्या नफ्यात वाढ झाली आहे. या अगोदर गेल्या तिमाहीमध्ये सीडीएमओ सेग्मेंटमध्ये कंपनीटा रेवेन्यू 48 टक्क्यांनी वाढून 574 करोड रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. गेल्या वित्त वर्षात कंपनीत ओवरऑल रेवेन्यू वाढ जवळपास संथ होती.