100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर; 80 % पर्यंत रिटर्न्स मिळण्याची शक्यता
Rakesh Jhunjhunwala Portfolio : जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर बुलिश दिसत आहेत. बहुतांश ब्रोकरेजने या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.
मुंबई : Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock SAIL:शेअर बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या काळात अनेक शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चांगले दिसत आहेत. सरकारी मालकीची कंपनी SAIL ने मार्च 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा नफा कमी झाला आहे परंतु पुढील व्यवसायाचा दृष्टीकोन अधिक चांगला दिसत आहे
जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसेस स्टॉकवर बुलिश आहेत. बहुतांश ब्रोकरेज हाऊसेसने शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही सेलमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, झुनझुनवाला यांची कंपनीतील होल्डिंग 1 टक्क्यांहून कमी झाली आहे.
SAIL:
निकालानंतर, जेपी मॉर्गनने सेलच्या स्टॉकवरील 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवले आहे. तसेच, लक्ष्य किंमत 165 रुपयांवरून 135 रुपये प्रति शेअर केली आहे. सिटीने SAIL वर आपले खरेदीचे मत कायम ठेवले आहे. लक्ष्य किंमत 155 रुपयांवरून 90 रुपये करण्यात आली आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी सेलमध्ये खरेदी सल्ला दिला आहे आणि प्रति शेअर 90 रुपये लक्ष्य ठेवले आहे. रेल्वेकडून लवकरच मोठे कंत्राट मिळण्याची व्यवस्थापनाला अपेक्षा आहे.
जेपी मॉर्गनने 135 रुपयांचे टार्गेट दिले आहे. 24 मे 2022 रोजी शेअरची किंमत 74 रुपये होती. अशाप्रकारे, स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 82 टक्क्यांनी वाढू शकतो.
गेल्या वर्षभरात या शेअरचा परतावा निगेटीव्ह राहिला आहे. ट्रेंडलाइनच्या मते, बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांनी मार्च 2022 च्या तिमाहीत SAIL मधील त्यांचा हिस्सा कमी केला आहे. सरकारी कंपनीत त्यांची होल्डिंग 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. 25 मे 2022 च्या व्यवसायात, SAIL चे समभाग 3 टक्क्यांहून अधिक घसरले.
SAIL:
PSU कंपनी SAIL चा एकत्रित निव्वळ नफा मार्च 2022 च्या तिमाहीत 28 टक्क्यांनी घसरून 2479 कोटी रुपयांवर आला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत निव्वळ नफा 3,469.88 कोटी रुपये होता. मात्र, तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात 62 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीत सेलचे एकूण उत्पन्न 31,175.25 कोटी रुपये होते. मार्च 2021 च्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 23,533.19 कोटी रुपये होते. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 साठी प्रति शेअर 2.25 रुपये लाभांश जाहीर केला आहे.