मुंबई : भारतीय शेअर बाजारात बिग बूल अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं निधन झालं आहे. झुनझुनवालांचं ब्रीच कॅंडी रुग्णालयात निधन झालं आहे. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला. एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अलीकडेच त्यांनी आकासा विमानसेवा सुरू करून स्वस्त विमान प्रवासाचे आश्वासन दिले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण व्यापारी जगतात शोककळा पसरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपलं मोठं व्यावसायिक साम्राज्य मागे सोडून राकेश झुनझुनवाला एक दुसऱ्या जगात गेले आहेत. फक्त बिग बूलच नाही तर त्यांची ओळख भारताचे वॉरेन बफे अशी देखील आहे. त्यांच्या निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. 


 राकेश झुनझुनवाला  यांचं कुटुंब
राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala), मुलगी निष्टा झुनझुनवाला  (Aryaman Jhunjhulwala), मुलगा आर्यमन झुनझुनवाला (Aryaman Jhunjhulwala) , मुलगी आर्यवीर झुनझुनवाला  (Aryavir Jhunjhunwala) असा परिवार आहे.


 राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती
अवघ्या 5,000 रुपयांपासून सुरुवात करुन त्यांनी 40,000 कोटी रुपयांचे साम्राज्य निर्माण केलं. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, राकेश झुनझुनवाला सध्या अब्जाधीशांच्या यादीत जगातील 440 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.


राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 40 हजार कोटी आहे. महत्त्वाचं म्हणजे आकासा एअरमध्ये सर्वात मोठी भागीदारी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे आहे.  राकेश झुनझुनवाला यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि 7 ऑगस्टपासून कंपनीचं काम सुरू झालं.