मुंबई : दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. ते कोणते स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करतात तसेच कोणत्या स्टॉकमधून गुंतवणूक काढून घेतात. याकडे किरकोळ गुंतवणूकदारांचे लक्ष असते. नुकत्याच आलेल्या अपडेट नुसार, वोकेशनल ट्रेनिंग सर्विसे प्रोवाइडर Aptech चे शेअर झुनझुनवाला यांनी विकले आहेत. हा स्टॉक त्यांच्यासाठी मल्टीबॅगर ठरला होता. Aptech च्या स्टॉकने मागील वर्षभरात 190 टक्क्यांचा परतावा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक घटली.


डिसेंबर तिमाहीच्या होल़्डिंगनुसार राकेश झुनझुनवाला यांच्याकडे आता Aptechची 23.4 टक्क्यांची भागीदारी आहे. सध्या त्यांच्याकडे कंपनीचे 9668840 शेअर आहेत.


ज्यांची किंमत 415 कोटी इतकी आहे. त्याआधीच्या सप्टेंबर तिंमाहीत झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीची 23.8 टक्के इतकी हिस्सेदारी होती,


Aptech चा स्टॉक लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये मल्टीबॅगर ठरला आहे. मागील एका वर्षात Aptech च्या स्टॉकने 190 टक्क्यांचा परतावा दिला आहे.


दरम्यान शेअरचा भाव 147 रुपयांनी वाढून 426 रुपये इतका झाला आहे. तसेच गेल्या 5 वर्षात शेअरने 125 टक्के रिटर्न दिला आहे. 6 महिन्यांचा परतावा साधारण 10 टक्के इतका राहिला आहे.