राकेश झुनझुनवाला यांची पुढची खेळी, या सरकारी बँकेचे 2.88 कोटी खरेदी केले शेअर; तुमच्याकडे आहेत का?
Rakesh Jhunjhunwala portfolio: शेअर मार्केटचे दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी आणखी एक मोठी खेळी खेळली आहे.
मुंबई : Rakesh Jhunjhunwala portfolio: शेअर मार्केटचे दिग्गज राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी आणखी एक मोठी खेळी खेळली आहे. भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेत हिस्सा विकत घेतला आहे. त्यांनी बँकेचे 28850000 शेअर्स अर्थात सुमारे 1.59 टक्के समभाग खरेदी केले आहेत. कॅनरा बँकेने स्टॉक एक्सचेंज BSE च्या वेबसाइटवर नवीनतम शेअर होल्डिंग पॅटर्न बद्दल ही माहिती दिली आहे. मंगळवारी कॅनरा बँकेचा शेअर 2 टक्क्यांनी वाढला आणि 160 रुपयांवर बंद झाला.
जून तिमाहीत तिसरी मोठी गुंतवणूक
जून तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर कॅनरा बँक ही तिसरी कंपनी आहे, ज्यात राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी नवीन गुंतवणूक केली आहे. कॅनरा बँक व्यतिरिक्त, त्यांनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) आणि इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समध्ये नवीन गुंतवणूक केली आहे. झुनझुनवाला यांनी SAILचे 57,500,000 शेअर्स खरेदी केले असून त्यात 1.4 टक्के भागभांडवल आहे. त्याचबरोबर त्याने इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्समध्ये (Indiabulls Housing Finance) 2.2 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. त्याच्याकडे कंपनीचे 10,000,000 शेअर्स आहेत.
कोणत्या कंपन्यांनी भागभांडवल वाढवले किंवा कमी केले
राकेश झुनझुनवाला यांनी Edelweiss Financial Services Ltdमध्ये आपला हिस्सा 0.4 टक्क्यांनी वाढवून 1.6 टक्के केला आहे. त्यांनी फेडरल बँकेत 0.38 टक्के भागभांडवल उभारले आहे. त्याचवेळी, टायटन कंपनीतील सुमारे 0.3 टक्के हिस्सा कमी करून 4.8 टक्के करण्यात आला आहे. त्यांनी टायटनचे सुमारे 22.5 लाख शेअर्स विकले.
तर Crisil Ltdमध्ये पूर्वीप्रमाणेच भागभांडवल 5.5 टक्के राखले गेले आहे. Lupin Ltdवर विश्वास व्यक्त करताना त्यांनी पूर्वीप्रमाणे 1.6 टक्के हिस्सा कायम ठेवला आहे. त्यानी NCC, Rallis India आणि Jubilant Ingrevia मध्ये शेअर्स खरेदी केले नाहीत तसेच विकलेले नाहीत.
त्यांनी Autoline Industriesमधील 1.03 टक्के हिस्सा कमी केला आहे. टाटा मोटर्समधील हिस्सा 0.15 टक्के आणि अपटेक लिमिटेडमधील 0.04 टक्के कमी झाला आहे.
Canara Bank: 1 वर्षात 46 टक्के परतावा
कॅनरा बँकेने गेल्या 1 वर्षात सुमारे 46% परतावा दिला आहे. या दरम्यान, शेअरची किंमत 107 रुपयांवरून 156 रुपये झाली. त्याचवेळी, यावर्षी बँकेचा परतावा सुमारे 17 टक्के आहे. तथापि, गेल्या 5 वर्षांचा परतावा नकारात्मक आहे. नोव्हेंबर 2010 मध्ये स्टॉक 700 रुपयांच्या पुढे गेला होता. 1 वर्षापूर्वीपर्यंत यात मोठी घट झाली होती.