मुंबई : मागील वर्षात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. अनेक गुंतवणूकदार शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून श्रीमंत झाले आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील टायटनच्या स्टॉकने गेल्या वर्षी 4 हजार कोटी रुपयांहून अधिक नफा कमावला आहे. टायटनचा स्टॉक 2021 मध्ये सुमारे 62 टक्क्यांनी वाढला. त्याची किंमत 1551 रुपयांवरून 2524.35 रुपयांवर पोहोचली आहे.


मार्केट एक्सपर्टची मते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षाच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी टायटनचे शेअर साधारण 0.6 टक्क्यांनी घसरले अन् 2508.30 रुपयांवर आले. मार्केट एक्स्पर्टच्या मते या शेअरमध्ये दीर्घ काळासाठी वाढ होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट थंडावल्यानंतर सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांची टायटनच्या प्रोडक्टला मागणी वाढल्यामुळे शेअरची किंमतही वाढली होती.


राकेश झुनझुनवाला यांची होल्डिंग


राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत टायटनचे शेअरहोल्डिंग 4.87 टक्के इतकी होती.


30 सप्टेंबर 2021 रोजी हा स्टॉक NSE वर 2161.85 रुपयांवर बंद झाला. 31 डिसेंबर 2021 रोजी, हा स्टॉक NSE वर 2517.55 रुपयांवर होता. झुनझुनवाला दाम्पत्याकडे 4.33 कोटी शेअर्स आहेत, म्हणजेच टायटनच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे त्यांना गेल्या वर्षी 4214 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.


मार्केट एक्सपर्टचे मत


या कंपनीच्या शेअरवर मार्केट एक्सपर्ट बुलीश आहेत. टायटन अजूनही दीर्घ अवधीसाठी चांगला परतावा देऊ शकतो असे मार्केट एक्सपर्टचे मत आहे.