मुंबई : शेअर मार्केटचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझूनवाला यांच्या पोर्टफोलिओवर अनेक छोट्यामोठ्या गुंतवणूकदारांची नजर असते. त्यांच्या पोर्टफोलिओकडे पाहून अनेक गुंतवणूक आपला पोर्टफोलिओ सेट करीत असतात. नुकताच त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेला Fortis Healthcare या शेअरचा चार्ट गुंतवणूकीसाठी  सकारात्मक संकेत देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका महिन्यात बंपर कमाईची शक्यता
एक्सपर्ट्सच्या मते, Fortis Healthcare च्या शेअरमध्ये सकारात्मक हालचाली दिसून येत आहेत. शेअरमध्ये 300 ते 302 रुपयांच्यावर ब्रेकआऊट दिसून येऊ शकतो. अनेक एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, एक महिन्यात हा शेअर पुढे 20 टक्क्यांपर्यंत तेजी नोंदवू शकतो. 


मागील आठवड्यात फोर्टिस हेल्थ केअरचा शेअर 11 टक्क्यांनी वाढला आहे. यापुढे शेअरमध्ये नफा कमाईची संधी आहे. सध्या शेअरची किंमत 266 रुपयांच्या आसपास असून या लेवलवर शेअरला चांगला सपोर्ट दिसत आहे. यामुळे एक्सपर्ट्स यावर बुलिश आहे.