Raksha Bandhan 2022 : भावासाठी राखी खरेदी करण्यापूर्वी `या` गोष्टींची नक्की काळजी घ्या
कशी निवडाल राखी?
Raksha Bandhan Significance: श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी शंकरानं संपूर्ण पृथ्वीला तिचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं. रक्षणाचं महत्त्वं हे शंकराच्या महत्त्वाइतकंच मोठं. बहिण- भावाच्या नात्यामागेही शिव- तत्त्वाच्या लीला आहेत असं म्हटलं जातं. रक्षाबंधनाच्या दिवसाचं हे महत्त्वं पाहता यंदाच्या वर्षी या नव्या आणि कधीच न ऐकलेल्या माहितीच्या साथीनं हा सण साजरा करा. (Raksha Bandhan 2022 date significance interesting information)
रक्षाबंधन तोंडावर आलेलं असतानाच बाजार सध्या असंख्य प्रकारच्या राख्यांनी खुलले आहेत. विविध प्रकारच्या, आकाराच्या, रंगांच्या राख्या सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. तुम्हीही राखी खरेदी करण्याच्या तयारीत असालच. पण, त्याआधी ही बातमी वाचा.
कशी निवडाल राखी?
- सूती धाग्याचं रक्षा सूत्र कायम महत्त्वातचं असतं. राखी खरेदी करताना या गोष्टीची काळजी घ्या की त्यामध्ये काळा किंवा करड्या रंगाचा धागा नसेल. लहान मुलांसाठी काही कल्पक राख्या तुम्ही घेऊ शकता. पण, त्यामध्ये रंगाची मात्र काळजी घ्या.
- राखी बांधतेवेळी रिकाम्या हातानं बसू नका. बहिणीच्या आरतीमध्ये तिच्यासाठी न विसरता ओवाळणी द्या. बहिणीचा आशीर्वाद घ्यायला विसरु नका.
बहीण भावाच्या नात्याला आणखी घट्ट करणारं असं हे रक्षाबंधन यावेळी अनोख्या पद्धतीने साजरा करा आणि हे क्षण अविस्मरणीय बनवा.