Ram Mandir Ayodhya: प्राणप्रतिष्ठेसाठी राम लल्लाची मूर्ती ठरली? ती का आहे इतकी खास?
Ram Mandir Ayodhya: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी ही माहिती दिलीये. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला राम मंदिराचा अभिषेक सोहळा करणार आहेत. हा एक सोहळा असेल जो संपूर्ण देशासाठी खास असणार आहे.
Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिरात प्रभू राम यांच्या प्रतिष्ठापनेची वेळ जसजशी जवळ येत आहे, तशी तयारीही पूर्ण होताना दिसतेय. यासाठी प्रभू रामाच्या एका मूर्तीचा फोटो समोर आला आहे. कर्नाटकचे योगीराज अरुण हे याचे शिल्पकार आहेत. शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामललाच्या मूर्तीचे अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात अभिषेक करण्यात येणार असल्याची माहिती असून अधिकृत माहिती मात्र मिळालेली नाही.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी ही माहिती दिलीये. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला राम मंदिराचा अभिषेक सोहळा करणार आहेत. हा एक सोहळा असेल जो संपूर्ण देशासाठी खास असणार आहे.
कर्नाटकसाठी हे खूप खास असणार आहे, याचं कारण म्हणजे शिल्पकाराने बनवलेली मूर्ती मंदिरात बसवली जाणार आहे. येडियुरप्पा यांनी सोशल मीडियावर ही गोष्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी शिल्पकार योगीराज अरुण यांचे हार्दिक अभिनंदन केलं आहे.
येडियुरप्पा यांचा मुलगा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय विजयेंद्र यांनीही कौतुक केलंय. विजयेंद्र म्हणाले, 'अद्वितीय शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली रामललाची मूर्ती 22 जानेवारीला अयोध्येत बसवणं ही म्हैसूरची, कर्नाटकची शान आहे.'
3 मुर्तिकारांची केली होती निवड
मिळालेल्या माहितीनुसार, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने 'रामलला'ची मूर्ती तयार करण्यासाठी निवडलेल्या तीन शिल्पकारांपैकी योगीराज एक होते. योगीराज म्हणाले, 'मला आनंद आहे की, 'रामाची मूर्ती कोरण्यासाठी निवडलेल्या देशातील तीन शिल्पकारांपैकी मी होतो.
मूर्तीबाबत संभ्रम कायम
अयोध्येतील सोहळ्यात प्राणप्रतिष्ठेसाठी रामलल्लाची मूर्ती ठरल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी दिलीये.. ट्विटर या सोशल साईटवरुन त्यांनी याबाबतची माहिती दिलीये. म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तीला हा मान मिळाल्याचं जोशींनी म्हटलंय. रामलल्लाच्या मूर्तीचा फोटोही त्यांनी ट्विट केलाय.
मात्र या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अयोध्या न्यास समितीनेही याला दुजोरा दिलेला नाहीये. त्यामुळे रामल्लाच्या मूर्तीबाबत संभ्रम अजूनही कायम आहे.