मुंबई : भव्य राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या 'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची पहिली बैठक प्रयागराजमध्ये होणार आहे. येत्या 10 दिवसात ही बैठक होणार आहे. ज्यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष आणि इतर सदस्य सहभागी होणार आहेत. बैठकीत राम मंदिराबाबत विस्तारात चर्चा होईल. ट्रस्टसाठी जॉईंट बँक अकाउंट उघडण्यासाठी देखील चर्चा होईल. राम मंदिरासाठी दान त्याच अकाऊंटमधून घेण्यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 फेब्रवारीला संसदेत राम मंदिर बनवण्यासाठी ट्रस्टची घोषणा केली होती. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनंतर 67.703 एकर जमीन ही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला दिली आहे.


श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य


के. परासरन (रामललाचे वकील)
जगतगुरु शंकराचार्य ज्योतिषपीठाधीश्वर स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज (प्रयागराज)
जगतगुरु माधवाचार्य स्वामी विश्व प्रसन्नतीर्थ महाराज (पेजावर मठ, उडुपी)
युगपुरुष परमानंद महाराज (हरिद्वार)
स्वामी गोविंददेव गिरी महाराज (पुणे) - पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या तत्वज्ञान विद्यापीठ (ठाणे) चे विद्यार्थी
महंत दिनेंद्र दास (निर्मोही अखाडा, अयोध्या)
विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र (अयोध्या)
अनिल मिश्र (होमियोपेथी डॉक्टर, अयोध्या)
कामेश्वर चौपाल (अनुसूचित जातीचे सदस्य, पटना)


या ट्रस्ट बोर्डचे सदस्य बहुमताने 2 प्रमुख सदस्यांची निवड करतील. केंद्र सरकारमधून ही एक प्रतिनिधी या बोर्डमध्ये सहभागी असेल. जो आयएएस अधिकारी असेल आणि त्यांचा दर्जा जॉईंट सेक्रेटरी पेक्षा कमी नसेल. केंद्राचे हे प्रतिनिधी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य असतील. राम मंदिर परिसरात विकास आणि प्रशासनाशी संबंधित प्रकरणावर निर्णय घेण्यासाठी कमेटीच्या चेअरमनची नियुक्ती ट्रस्ट करेल.


ट्रस्टमध्ये उत्तर प्रदेश सरकारचे 2 प्रतिनिधी ही असतील. राज्य सरकारचे सचिव जे आयएएस अधिकारी असतील आणि दुसरे अयोध्येचे जिलाधिकारी असतील. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचे हे सदस्य हिंदू धर्माला मानणारे असतील अशी अट ठेवण्यात आली आहे. जर अयोध्येचे जिलाधिकारी हिंदू नसतील तर इतर अॅडिशनल कलेक्टर याचे सदस्य असतील.