Ram Navami Holiday: कॅश भरणे, काढणे, बॅंक अकाऊंट उघडणे, लोनचे हफ्त भरणे अशी अनेक कामे करण्यासाठी नागरिकांना बॅंकेत जावे लागते. पण अनेकदा बॅंका बंद असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडते. त्यामुळे बॅंक हॉलीडे कधी आहे, याची माहिती असणे आवश्यक आहे. 17 एप्रिल रोजी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये राम नवमीची सुट्टी असते. त्यावेळी बॅंक बंद राहणार आहेत. ऐनवेळी होणारी तारांबळ टाळण्यासाठी बॅंक हॉलीडे बद्दल जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामनवमीला बँका बंद आहेत का? असा प्रश्न इंटरनेटवर विचारला जातो.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक ऑफिशियल हॉलिडे कॅलेंडरवर याची माहिती देण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये राम नवमीच्या निमित्ताने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका बुधवारी म्हणजेच 17 एप्रिल रोजी बंद राहतील. पण इतर ठिकाणी सुरु असतील, याची नोंद घ्या .


बँकेच्या सुट्ट्या राज्यानुसार भिन्न असतात. गणेशोत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यावेळी इतर राज्यात सुट्टी नसते. राम नवमी हा दिवस भगवान रामाच्या जयंती म्हणून देशभरातील विविध शहरांमध्ये साजरा केला जातो. 


त्यामुळे राम नवमीच्या दिवशी अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची, शिमलाओन येथे श्री रामनवमीच्या सणाला बँका बंद राहणार आहेत, याची नागरिकांनी नोंद घ्या.


रेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही 


3 कॅटेगरीमध्ये सुट्ट्या


रिझर्व बॅंक ऑफ इंडिया आपली अधिकृत वेबसाइट- https://www.rbi.org.in/ वर बँक सुट्ट्यांची यादी जारी करते. आरबीआय तीन कॅटेगरीमध्ये सुट्ट्या ठेवते. यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत सुट्टी, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत सुट्टी आणि रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडेज; आणि बँकांची खाती बंद करणे, यांचा समावेश असतो.


तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? 'अशी' तपासा


बँकेशी संबंधित कामे करा ऑनलाइन 


बॅंकाची बहुतांश कामे ही मोबाईल अॅप किंवा वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून केली जातात. त्यामुळे राम नवमीच्या सुट्टीवेळी बँका बंद असल्या तरी बँकेच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध असतील. त्यामुळे टेक्नोसेव्ही असलेल्या ग्राहकांना कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. पण अनेकजण आजही मोबाईल, वेबसाइटचा वापर करत नाहीत, त्यांना मात्र व्यवहारासाठी बॅंकेवर अवलंबून राहावे लागते. 


एप्रिल 2024 मध्ये आगामी बँक सुट्टी


एप्रिल महिन्यातील 15 दिवस पूर्ण झाले आहेत. दरम्यान उरलेल्या 15 दिवसातील 4 दिवस बॅंक हॉलीडे असेस, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.20 एप्रिल 2024 रोजी गर्या पूजेमुळे आगरतळा येथे बँकेला सुट्टी असेल. 21 एप्रिल 2024 रोजी रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील. 27 एप्रिल 2024 रोजी चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील. 28 एप्रिल 2024 रोजी रविवारमुळे देशभरात बँका बंद राहतील, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे बॅंके संबंधी व्यवहार सुट्ट्यांच्या आधीच उरकून घ्यावे लागतील.


100 वर्षानंतर कशी दिसतील भारतातील गावं? AI ने शेअर केले फोटो