तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? 'अशी' तपासा

EPF Balance: आपल्या ईपीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम गोळा झाली हे कसे कळणार? आपला ईपीएफ बॅलेन्स कसा समजणार? यासाठी सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | Updated: Mar 5, 2024, 08:46 PM IST
तुमच्या EPF अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे? 'अशी' तपासा title=
EPF Balance Check

EPF Balance: आजकाल सर्वच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ईपीएफची सुविधा देतात. यामध्ये दर महिन्याला तुमच्या पगारातून काही रक्कम आणि कंपनीकडील छोटा भाग ईपीएफमध्ये जमा केला जातो. ईपीएफवर सरकारकडून चांगले व्याज दिले जाते. कर्मचारी आपल्या निवृत्तीची तरतूद भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून करत असतात. सध्या ईपीएफच्या रक्कमेवर 8.25 टक्के व्याज दिले जात आहे. ईपीएफद्वारे भविष्यासाठी चांगली रक्कम जोडली जाऊ शकते. तुमच्यापैकी अनेकजण ईपीएफ खात्यात अनेक वर्षांपासून पैसे जमा करत असतील. त्यांची आतापर्यंत बरीच रक्कम जमा झालेली असेल. पण आपल्या ईपीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम गोळा झाली हे कसे कळणार? आपला ईपीएफ बॅलेन्स कसा समजणार? यासाठी सोप्या ट्रिक्स जाणून घेऊया.

SMS द्वारे तपासा बॅलेन्स 

ईपीएफमध्ये जमा असलेली शिल्लक रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला जास्त उठाठेव करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलमधील एसएमएसद्वारे देखील ही माहिती मिळवू शकता. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 7738299899 वर 'EPFO UAN' एसएमएस पाठवा. यानंतर सिस्टम अपडेटेड बॅलन्ससह तुम्हाला एसएमएस पाठवला जाईल. 

हव्या त्या भाषेत शिल्लक तपासा 

तुम्हाला तुमच्या हव्या त्या भाषेत शिल्लक तपासण्याची सुविधा देण्यात आली आहे.  तर तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवा आणि भाषेचा कोड निवडा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला इंग्रजीमध्ये संदेश हवा असेल तर तुम्हाला संदेश द्यावा लागेल - 'EPFOHO UAN ENG' असे टाईप करुन पाठवावे लागेल.  EPFO कडून इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगाली इत्यादी भाषांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे.  

मिस्ड कॉलवर मिळेल तपशील 

तुम्ही EPFO ​​क्रमांकावर मिस कॉल देऊन तुमची EPF शिल्लक तपासू शकता. हे करण्यासाठी यूएएन पोर्टलवर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करुन घ्या. त्यानंतर या मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल द्या. तुमचा बँक खाते क्रमांक, आधार आणि पॅन तुमच्या UAN शी लिंक असेल तरच हा तपशील पाहायला मिळेल.

उमंग ॲपच्या मदतीने तपासा शिल्लक 

उमंग ॲपच्या मदतीने तुमची ईपीएफ शिल्लक देखील तपासू शकता. यासाठी सर्वप्रथम मोबाईलमध्ये उमंग ॲप इन्स्टॉल करा. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा.सर्च बारवर जा आणि EPFO ​​टाइप करा. यानंतर EPFO ​​पेज उघडेल. येथे खाली स्क्रोल केल्यावर कर्मचारी केंद्रित सेवा विभाग दिसेल. यामध्ये पहिल्या क्रमांकावरील View Passbook वर क्लिक करा.यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे व्हिजिट सर्व्हिसवर क्लिक करा.आता यूएएन क्रमांक टाकून गेट ओटीपीवर क्लिक करा.यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो भरा. यानंतर तुम्हाला तुमचे पासबुक दिसेल. यामध्ये बॅलन्सचे सर्व तपशील तुमच्या समोर येतील.