नवी दिल्ली : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने साध्वीच्या बलात्काराखाली आरोपी राम रहीमला दोषी ठरवलं आहे. यानंतकर आज त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. राम रहीमकडे कोटींची संपत्ती होती. एका रिपोर्टनुसार त्याच्याकडे सिरसामध्ये ७०० एकरवर शेत, २५० आश्रम, आय बँक, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. त्याची एक दिवसाची कमाई १६ लाख रुपये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन रुग्णालय आणि एक आंतरराष्ट्रीय डोळ्यांचा दवाखाना त्याच्याकडे आहे. राम रहीमकडे गॅस स्टेशन आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स देखील आहे. जगभरात त्याचे २५० आश्रम आणि करोडो भक्त आहेत. 


२०१०-११ मध्ये डेराची एकूण कमाई १६ कोटी रुपये आहे. पुढच्या वर्षी ती ३० कोटी झाली. त्याच्या पुढच्या वर्षी ती २९ कोटी झाली. डेरा सच्चा सौदा आणि त्याच्याशी संबंधित इतर संघटनांवर कोणताही इनकम टॅक्स नाही लागत. कलम १९६१ १०(२३) नुसार संघटनेला टॅक्समधून सूट मिळाली आहे.


पाहा राम रहिमची लाईफ स्टाईल