सिरसा : गेल्या शुक्रवारी डेरा सच्चा सौदाचा बाबा राम रहीम याला साध्वी यौन शोषण प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. यासोबतच बाबाची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत इंसादेखील सोबत होती. मात्र बाबाच्या कुटुंबातील इतर लोकांचा मात्र यामध्ये समावेश नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंदीगढच्या रोहतक जेलमध्ये जाईपर्यंत बाबासोबत हनीप्रीत एकटीच होती. या संपूर्ण प्रकरणात कधीच बाबाची पत्नी कॅमेरासमोर आलेली नाही. खूप कमी लोकं त्याच्या पत्नीबाबत जाणतात. या आपण बघूया बाबाच्या कुटुंबियांच्याबाबतीतली ही माहिती.... 


गुरमीत राम रहीम सिंह आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. गुरमीतच्या जन्माअगोदर मघर सिंह यांची पत्नी नसीब कौरने एका मुलीला जन्म दिला होता. मात्र कालांतराने तिचा मृत्यू झाला. 


राम रहीम सिंहने ९ वीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं मात्र काही कारणामुळे तो १० वीच्या इयत्तेत जाऊन अर्ध्यातूनच सोडले. आणि शिक्षण सोडल्यानंतर त्याच लग्न हरजीतसोबत झालं. 


लग्नानंतर त्याला जसमीत हा मुलगा झाला. आणि त्यानंतर मुलगी चरणप्रीत आणि लहान मुलगी अमरप्रीत जन्माला आली. 


बाबा राम रहीमची पत्नी डेऱ्यातच राहते. मात्र ती सार्वजनिक कार्यात आणि ठिकाणी फार कमी दिसते. बाबाने तिसरी मुलगी म्हणजे आपलं चौथं अपत्य दत्तक घेतलं आहे. 


जिचं नाव आहे प्रियंका जी फतेहाबादची राहणारी आहे. बाबाने प्रियंकाचं नाव बजलून हनीप्रीत ठेवलं आहे. आणि ही देखील डेऱ्यातच राहते. 


आणि डेरामुखीची माँ म्हणून नसीब कौर देखील डेऱ्यातच राहते.