नवी दिल्ली : बलात्काराच्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी बाबा राम रहीमने अनेक क्लृप्त्या लढवल्या. इतक्या की, स्वत: नपुंसक असल्याचे कोर्टाला सांगण्याचाही बाबाने प्रयत्न केला. पण, बाबाची चलाखी कोर्टापुढे टिकली नाही. बाबाच्या युक्तीवादावर तुम्हाला मुले कशी झाली? हा सवाल विचारत कोर्टाने बाबाला क्लिन बोल्ड केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा राम रहीमचा खटला विशेष सीबीआय कोर्टासमोर चालला. हा खटला जेव्हा सीबीआय न्यायाधीश जगदीप कुमार यांच्यासमोर सुनावनीसाठी आला तेव्हा, बाबाचे पहिले स्टेटमेंट रेकॉर्ड झाले. ज्यात त्याने स्वत:ला आपण मानसिकदृष्ट्या विकलांग अहोत. त्यामुळे शरीरसंबंध ठेवणे ही तर दूरची बाब, असे म्हटले होते. तसेच, आपण नपुंसक आहोत. त्यामुळे आपल्यावरील बलात्काराचा आरोप काढून टाकण्यात यावा असाही युक्तीवाद केला होता. दरम्यान, बाबाच्या या युक्तिवादाला केराची टोपली दाखवताना तुम्हाला दोन मुली आहेत. त्यामुळे आपला दावा निराधार असल्याचे कोर्टाने म्हटले होते.


२५ ऑगस्टला कोर्टाने बाबाला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले तेव्हा, राम रहीमच्या वकिलाने बचावासाठी युक्तीवाद केला. बाबाच्या वकिलाने दावा केला की, सन १९९०पासून बाबा नपुंसक आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमातून आलेल्या वृत्तांनुसार सुनावनीदरम्यान बाबाने म्हटले होते की, १९९० पासून आपण कोणत्याही शारीरिक संबंधांसाठी सक्षम नव्हतो. त्यामुळे १९९९मध्ये कोणत्याही साध्वीवर मी बलात्कार करणेच शक्य नाही. १९९९मध्ये बाबा राम रहीम विरोधात बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.


दरम्यान, २५ ऑगस्टला पंचकुला सीबीआय कोर्टाने बाबाला दोषी ठरवत २० वर्षांची शिक्षा ठोठावली. तेव्हा बाबाच्या भडकलेल्या समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरूवात केली. या हिंसाचारात ३८ लोक मृत्यूमुखी पडले तर, २५० पेक्षा जास्त जखमी झाले होते.