चंदीगड : राम रहीमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसेमुळे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने घेतली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी डेराची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचकुलामधील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना अर्धसैनिक दलाची सुरक्षा पुरविण्यात यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आज दुपारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणी बाबा राम रहीमला दोषी ठरविले. या निकालानंतर हरियाणा आणि पंजाबमध्ये मोठा हिंसाचार उसळला. 


पंचकुलामध्ये राम रहीमच्या समर्थकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. या हिंसेमुळे २८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हिंसा उसळलल्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने डेरा सच्चा सौदाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत.