नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम हा बलात्कार प्रकरणात जेलमध्ये आहे. राम रहीमने सिनेमांतही काम केलं आहे. राम रहीमसोबत त्याचे कुटुंबीयही सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतची सध्या जोरदार चर्चा होताना पहायला मिळत आहे. याच हनीप्रीतने चक्क हॉलिवूड अभिनेता जॅकी चेनचाही रेकॉर्ड तोडला आहे. पाहूयात कुठला आहे हा रेकॉर्ड...


बाबा राम रहीम याने आतापर्यंत पाच सिनेमे बनवले आहेत आणि त्यामध्ये स्वत: मुख्य भूमिकेत होता. राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीतने सुद्धा सिनेमात काम केलं आहे. हनीप्रीतने 'हिंद का नापाक को जवाब' या सिनेमात भूमिका केली होती.



असा बनवला रेकॉर्ड...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हनीप्रीतने 'हिंद का नापाक को जवाब' या सिनेमात तब्बल २१ भूमिका केल्या आहेत. राम रहीमने दावा केला की असे करून हनीप्रीतने हॉलीवूड अभिनेता जॅकी चेनचाही रेकॉर्ड तोडला आहे.



रिपोर्ट्सनुसार, हनीप्रीत अभिनयासोबतच गाणं आणि फिल्म मेकिंगमध्येही खूप इच्छूक होती. हनीप्रीतने राम रहीमच्या हकीकत प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेल्या 'गुरुकुल ऑनलाइन' सारख्या सिनेमांचे सहदिग्दर्शनही केलं आहे.


दरम्यान, २०१५ साली राम रहीम आपला पहिला सिनेमा 'एमएसजी: द मेसेंजर' घेऊन आले. या सिनेमाचं दिग्दर्शनपासून गाणं लिहिण्यापर्यंत आणि अभिनयापर्यंतचं सर्व काम हनीप्रीतने पाहीलं आहे.



त्यानंतर आलेला 'एमएसजी २'. २०१६ साली आलेला 'एमएसजी: द वॉरियर लॉयन हार्ट' आला. तर २०१७ साली दोन सिनेमा आले. 'जट्टू इंजीनियर' आणि 'हिंद का नापाक को जवाब-एमएसजी लॉयन हार्ट-२'. राम रहीमच्या या सर्व सिनेमांमध्ये हनीप्रीतने काम केलं आहे.