Ram Setu high resolution photo : राम सेतू... भारतीयांसाठी कमालीचा जिव्हाळ्याचा विषय आणि संशोधकांसाठी संशोधनाचा मुद्दा. अशा या राम सेतूसंदर्भात अनेक सिद्धांत आजवर मांडण्यात आले आणि याच राम सेतूचे कैक फोटोसुद्धा आजवर शेअर करण्यात आले. अशा या अद्वितीय जागेसंदर्भातील एक कमाल आणि बहुधा पहिलाच इतका स्पष्ट फोटो जारी करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युरोपीयवन स्पेस एजन्सीच्या माध्यमातून हा High Resolution फोटो शेअर करण्यात आला असून, त्याचा उल्लेख या अंतराळ संशोधन संस्थेकडून 'अॅडम्स ब्रिज', राम ब्रिज किंवा राम सेतू असा करण्यात आला आहे ( Adam’s Bridge, a chain of shoals linking India and Sri Lanka).


Copernicus Sentinel-2 या मोहिमेअंतर्गत युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेकडून हा फोटो टीपण्यात आला आहे, जिथं फोटो Zoom करून पाहिला असता तिथं असणारी जीवसृष्टी आणि निसर्गाची कल्पना येत आहे.  


कुठं आहे हा राम सेतू? 


ESA च्या माहितीनुसार अॅडम्स ब्रिज, अर्थात राम सेतू भारताच्या दक्षिण पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या रामेश्वरम ते मन्नार बेटापर्यंतचा भाग आहे. मन्नार बेट हा श्रीलंकेच्या उत्तर पश्चिम किनारपट्टीवरील भाग असल्याचं सांगितलं जातं. 


हेसुद्धा वाचा : 'अंतराळातला बटाटा' आपल्या सूर्यमालेतील 'या' ग्रहाला धडकणार; NASA चा खुलासा


सदर सेतूसंदर्भात आजवर अनेक गोष्टी सांगितल्या आणि लिहिल्या गेल्या. दरम्यान, अंतराळ संशोधन संस्थेच्या माहितीनुसार भूगर्भशास्त्रज्ञांना निरीक्षणातून आढळलेल्या माहितीनुसार इथं आढळणारे चुनखडक हे एका बेटाचे अवशेष असून, हे बेट कधी एकेकाळी भारत आणि श्रीलंकेशी जोडलं गेलं होतं. अनेक उल्लेखांनुसार जवळपास 15 व्या शतकापर्यंत या नैसर्गिक पुलावरून ये-जा सुरू होती. ज्यानंतर काळानुरूप आलेल्या वादळांमुळं या पुलाचं अतोनात नुकसान झालं. छायाचित्रामध्ये दिसत असल्यानुसाल इथं वाळूता काही कोरडा भागही आहे, याशिवाय इथं दिसणारा फिकट निळसर भाग समुद्राच्या पाण्याची पातळी या भागात खोल नसल्याचं नमूद करते. उपलब्ध माहितीनुसार इथं समुद्राची पाणीपातळी अवघी 1 ते 10 मीटर इतकीच असल्याचं आढळतं. 



सातासमुद्रापार असणाऱ्या एका अंतराळसंशोधन संस्थेकडून भारतासाठी अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या राम सेतूसंदर्भात दिलेली माहिती सध्या अनेक चर्चांनाही वाव देऊन जात आहे.