'अंतराळातला बटाटा' आपल्या सूर्यमालेतील 'या' ग्रहाला धडकणार; NASA चा खुलासा

NASA Shared Photo Of Space Potato: नासा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगवेगळे फोटो आणि रंजक माहिती शेअर करत असते. असाच एक फोटो सध्या चर्चेत असून फोटोत दिसणाऱ्या गोष्टीला 'स्पेस पोटॅटो' म्हणजेच अंतराळातील बटाटा असं म्हणतात. हा 'अंतराळातील बटाटा' नेमका आहे तरी कसा आणि त्याच्यासंदर्भात नासाने काय सांगितलं आहे पाहूयात...

| Jun 25, 2024, 09:06 AM IST
1/9

Space Potato Martian Moon Phobos

अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'नासा' ही जगातील अग्रगण्य अवकाश संशोधन संस्था आहे.  

2/9

Space Potato Martian Moon Phobos

'नासा'कडून वेळोवेळी अंतराळातील वेगवेगळे फोटो आणि रंजक माहिती शेअर केली जाते. असाच एक फोटो सध्या चर्चेत आहे.  

3/9

Space Potato Martian Moon Phobos

नासाने शेअर केलेला हा फोटो मंगळाच्या चंद्राचा आहे. या चंद्राचं नाव फोबोस असं आहे. फोबोस हा मंगळाच्या दोन चंद्रांपैकी मोठा चंद्र आहे. मात्र पृथ्वीच्या चंद्राच्या तुलनेत तो फारच छोटा आहे.  

4/9

Space Potato Martian Moon Phobos

मंगळाला दोन चंद्र असून दुसऱ्याचं नाव डिमोस असं आहे. डिमोस हा फारच ओबडधोबड असून फोबोसप्रमाणे तो गोलाकार आकारच्या आसपासही नाही.  

5/9

Space Potato Martian Moon Phobos

मंगळाचा सर्वात मोठा चंद्र असलेला फोबोस अगदी छोट्या आकाराच्या बटाट्यासारखा दिसतो म्हणून त्याला 'अंतराळातील बटाटा' म्हणजेच स्पेस पोटॅटो असंही म्हटलं जातं.  

6/9

Space Potato Martian Moon Phobos

नासाने दिलेल्या माहितीनुसार, फोबोस हा आकाराने फार लहान असल्याने त्याच्या पृष्ठभागाला स्वत:कडे खेचण्याइतकं गुरुत्वाकर्षणही त्याच्याकडे नाही.  

7/9

Space Potato Martian Moon Phobos

नासाने दिलेल्या माहितीनुसार, फोबोस हा काही काळाने मंगळावर आदळणार आहे. दर 100 वर्षांमध्ये फोबोस मंगळाच्या 6 फूट जवळ येत आहे. असं सुरु राहिलं तर 5 कोटी वर्षात फोबोस मंगळावर आदळेल किंवा त्याचा स्फोट होऊन त्यापासून मंगळाभोवती रिंग तयार होईल.

8/9

Space Potato Martian Moon Phobos

म्हणजेच आपल्या पृथ्वी आणि चंद्रामध्ये गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांमध्ये असणारं संतुलन फोबोस आणि मंगळात नाही. असा प्रकार  डिमोससंदर्भातही आहे.  

9/9

Space Potato Martian Moon Phobos

त्यामुळेच फोबोसचा आकार हा वर्तुळाकार नसून ओबडधोबड म्हणजेच बटाट्यासारखा असल्याचं नासाने सांगितलं आहे. या चंद्रावर बसेच खड्डे आणि विवरं दिसत असल्याचंही नासाने म्हटलं आहे. (फोटो - नासा आणि सोशल मीडियावरुन साभार)