मुंबई : आरपीआयचे नेते आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लग्नाबाबत सल्ला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामदास आठवले यांनी लग्नाबाबत राहुल गांधी यांना सल्ला देताना म्हटलं आहे, 'राहुल गांधी दलितांच्या घरी जातात, जेवतात त्यांनी म्हणजेच राहुल गांधी यांनी आता दलित मुलीशी लग्न करावं, कारण जातीअंताच्या लढाईसाठी आंतरजातीय लग्न महत्वाची आहेत'.


तसेच राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत, ते चांगलं भाषण करतात, चांगले दौरे करतात, राहुल गांधी यांचं असं कोपरखळी मारून कौतुकही रामदास आठवले यांनी केलं.


राहुल गांधी यांना यापूर्वीही एका कार्यक्रमात, बॉक्सर विजेंद्र सिंगने,  राहुलजी आपण लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले होते, माझा माझ्या नशिबावर विश्वास आहे, होईल तेव्हा होईल.