वर्धा: काँग्रेससोबत राहून शरद पवारांची पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही. ते रालोआमध्ये सहभागी झाले तर त्यांना उपपंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करु, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते शनिवारी वर्धा येते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानपदासाठी विरोधकांकडे अनेक उमेदवार आहेत तर भाजपाकडे एकटे मोदीच आहेत. राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी पवारांना पाठिंबा देणार नाहीत. काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत ६० ते ७० जागा मिळतील, तर राष्ट्रवादीची मजल ६ ते ७ जागांच्या पलीकडे जाणार नाही. त्यामुळे पवार यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. मात्र, पवार रालोआमध्ये सामील झाल्यास ते उपपंतप्रधान होऊ शकतात, असे आठवले यांनी सांगितले. 


यावेळी आठवलेंनी प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्या युतीवरही शरसंधान साधले. भारिप आणि एमआयएमने हातमिळवणी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष फरक पडणार नाही. ते मला नेहमी विरोध का करतात, हेच कळत नाही. प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेबांचे नातू असल्याने आम्ही त्यांचा सन्मानच करतो. ते जर आमच्या टीममध्ये आले तर त्यांना अध्यक्षपदी बसवून त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास मी तयार असल्याचेही आठवलेंनी सांगितले.