मुंबई : गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यामुळे देशातील वातावरण प्रक्षुब्ध आहे. लडाखमध्ये भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या युद्धानंतर देशात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याविरोधात आवाज उठवला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यानी या घटनेनंतर चीन वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चायनीज विकणाऱ्या रेस्टॉरंटवर बंदी आणण्यात आली आहे. मी लोकांना अपील करतो की,त्यांनी चायनीज खाण्यावर बहिष्कार घातला जावा. या अगोदर अनेक नेत्यांनी चीनच्या वस्तूंवर बंदी घालावी अशी मागणी केली होती.


बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमारने शुक्रवारी आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी सांगितलं की,'चीनसोबत झालेल्या करारावर भारताला पुन्हा विचार करण्याची गरज आहे.' चीनमध्ये ज्या गोष्टींच उत्पादन होतं त्याचा कडाडून विरोध करायचा आणि त्यावर बहिष्कार घालावा. 



नीतिश कुमार यांनी सांगितलं आहे की,'चीनच्या वस्तू स्वस्त असतात मात्र त्या टिकाऊ नाही. त्यांच्यामुळे आपल्या देशात कचरा वाढत आहे. तसेच त्यांच्या वस्तू या प्लास्टिकच्या असतात. पर्यावरणाचा विचार करता या गोष्टी खूप हानिकारक आहे.' तसेच पुढे नीतिश कुमार म्हणाले की, चीनमधून जो कोरोना पसरला आहे. तो देखील नैसर्गिक वाटत नाही. असं वाटतं की, हे रासायनिक लॅबमधून निघालेला आहे.