नवी दिल्ली : येत्या १७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा महत्वाचा दिवस आहे. एनडीए आणि यूपीए दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आज आपला उमेदवारी अर्ज भरला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविंद यांच्या अर्ज भरण्याताना प्रस्तावक त्यांच्यासोबत संसदेत आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे पहिले प्रस्ताव असून, दुसरे प्रस्तावक भाजपचे अध्यक्ष अमित शाह असतील. तिसरे प्रस्तावक म्हणून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सही करणार आहेत तर चौथे प्रस्तावक म्हणून अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल हजेर होते.


अनुमोदकांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आंनदराव अडसूळ आहेत. याशिवाय अनुमोदनासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातले बहुतांश बडे मंत्री हजर होते. एनडीएच्या सदस्य पक्षांसोबत बिहारमधून जेडीयू, उडिशातून बीजेडी, तामिळनाडूतून अण्णा द्रमुक आणि तेलंगणातून टीआरएस आणि आंध्रमधून वायएसआर काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा दिला आहे.