ग्रामपंचायत सदस्य ते मंत्रिमंडळात स्थान, रावसाहेब दानवेंचा प्रवास
ग्रामपंचायत सदस्य ते मंत्रिमंडळात स्थान असा रावसाहेब दानवेंचा प्रवास
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधान पदाची शपथ घेतील. यावेळी अनेक राष्ट्रांतील महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच देशातील महत्वाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोदींसोबत भाजप आणि अन्य घटकपक्षांतील काही खासदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासून मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. कालपासून अनेक खासदारांची नावे प्रचंड चर्चेत होती. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देखील मंत्रिमंडळात असणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दानवे यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. एका व्यक्तीला दोन मोठ्या जवाबदारी देणे शक्य नसल्याने राज्यात आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाचे नाव जाहीर होते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान रावसाहेब दानवे यांच्याविषयी माहिती घेऊया....
नाव: रावसाहेब दादाराव दानवे.
जन्मतारीख: 18 मार्च 1956
जन्मस्थळ: जवखेडा खुर्द,ता.भोकरदन,जि. जालना(महाराष्ट्र)
शिक्षण: पदवीधर(B.A.)
मतदारसंघ: जालना(महाराष्ट्र)
राजकीय प्रवास: ग्रामपंचायत सदस्य,जवखेडा खुर्द,
सभापती,पंचायत समिती,भोकरदन.
-1990 ते 1995, 1995 ते 1999 पर्यंत 2 वेळा भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघाचे आमदार.
-1999 पासून सलग जालना लोकसभा मतदार संघातून खासदार.सलग 5 वेळा जालना लोकसभा मतदार संघातून खासदार.
-संसदेच्या विविध समित्यांवर सदस्य म्हणून कामगिरी बजावली.
-वाणिज्य संबंधी संसदीय स्थायी समिती,संसदीय सल्लागार समिती,पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संबंधी संसदीय स्थायी समिती,कृषी संबंधी संसदीय स्थायी समिती सह विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम.
-2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्री मंडळात 9 महिने राज्यमंत्री म्हणून निवड त्यानंतर महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी.
-आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात पुन्हा वर्णी.