तिरुअनंतपूरम :  येथील एका आमदाराने ५१ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघड झालेय. या आमदाराला पोलिसांनी अटक केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळमधील आमदार एम विन्सेट याला पोलिसांनी अटक केलेय. या पोलीस कारवाईनंतर विन्सेट राजीनामा देण्याची शक्यता आहेत. तिरुअनंतपूरममधील बलरामपूरम येथे राहणाऱ्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेच्या पतीला हा प्रकार लक्षात येताच त्याने पत्नीला रुग्णालयात दाखल केले. महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात आमदार एम विन्सेटने बलात्कार केल्याचे म्हटलेय.


आमदार विन्सेट हा गेल्या काही दिवसांपासून माझा लैंगिक छळ करत होता. माझा पाठलाग करत होता. या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे या पीडीत महिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलेय. 


याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी विन्सेटची कसून चौकशी केली. दोन तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. विन्सेटने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. दरम्यान,  विन्सेट यांने बलात्काराचे आरोप फेटाळून लावलेत. माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचे म्हटलेय.