नवी दिल्ली : बलात्कारच्या आरोपात शिक्षा झालेले बाबा राम रहीम आणि आसाराम याच्यानंतर आता आणखीन एका बाबावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी कौशलेंद्र प्रपन्नाचारी फलाहारी महाराज याच्याविरोधात आरोप करण्यात आला आहे. बलात्काराचा आरोप त्याच्याच आश्रमातील तरुणीने केला आहे. पीडित तरुणीने बाबा विरोधात गुन्हाही दाखल केला आहे.


आरोपी बाबाचा अलवरमध्ये दिव्य धाम आश्रम आहे. अनेक एकर परिसरात पसरलेल्या या आश्रमात वेद विद्यालय आणि मंदिरही बांधण्यात आलं आहे. या महाराजच्या फॉलोअर्सची संख्याही लाखोंमध्ये आहे.


पीडित मुलगी एलएलबीचं शिक्षण घेत आहे. या महाराजाच्या शिफारशीमुळे तिला इंटर्नशिप मिळाली. इंटर्नशिप मिळाल्यानंतर ही तरुणी महाराजला भेटण्यासाठी आश्रमात दाखल झाली. ७ ऑगस्ट रोजी या मुलीला महाराजने एकांतात बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला असा आरोप करण्यात आला आहे.