संतापजनक, दिल्लीत शाळेत चिमुरडीवर बलात्कार
राजधानी नवी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दुसरीतील चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दुसरीतील चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. इलेक्ट्रीशनने या लहान मुलीवर बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दिल्ली पोलिसांना नोटीस बजावत या घटनेची सर्व माहिती मागवलीय.
तसेच शाळेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. ही मुलगी घरी जात असताना आरोपी राम अश्रयने तिला शाळेच्या आवारातील एका खोलीत नेले आणि बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी गेल्या दोन महिन्यांपासून या शाळेत काम करतोय. त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.