नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत अवध्या 6 वर्षांच्या मुलीचा बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्व परिसरात खळबळ माजली आहे.  दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक केली आहे. त्याचप्रमाणे पीडित मुलीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मयूर विहार पोलीस स्टेशन अंतर्गत 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. या घटनेची माहिची पोलिसांच्या हाती लागताचं आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे आरोपीला कठोर शिक्षा झालीचं पाहिजे अशी मागणी होत आहे. 


9 वर्षीय मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला
काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका 9 वर्षांच्या मुलीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. मुलीचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला. शिवाय हे कृत्य स्मशान भूमीतील पुजाऱ्याने केल्याचा दावा देखील मुलीच्या पालकांनी केला. पुजारीने पालकांच्या संमतीशिवाय तिच्यावर अंत्यसंस्कार केले.


मुलीच्या कुटुंबीयांसह शेकडो लोकांनी धरणे आंदोलन केले आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.