सीबीआयने मला प्रश्न विचारावेत, मुलाला त्रास देऊ नये - चिदंबरम
एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी सीबीआय पी.चिदंबरम यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे, त्यानंतर पी चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली : सीबीआयने मला प्रश्न विचारावेत, मुलाला त्रास देऊ नये, असं माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी सीबीआय पी.चिदंबरम यांच्या मुलाची चौकशी सुरू केली आहे, त्यानंतर पी चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं आहे.
तपास यंत्रणा चुकीची माहिती पसरवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणेने २००६ मध्ये झालेल्या एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात विदेशी गुंतवणुकीप्रकरणी गुरूवारी कार्ती चिदंबरम यांना चौकशीसाठी बोलावले होते. चिदंबरम अर्थमंत्री असताना या व्यवहाराला परवानगी देण्यात आली होती.
कार्तीने सीबीआयसमोर चौकशीसाठी जाण्यास नकार दिला होता. एका विशेष न्यायालयाने सर्व आरोपातून मुक्त केले होते, याप्रकरणाची सुनावणी संपली होती, असे त्यांचे म्हणणे आहे. चिदंबरम यांनी एकामागे एक ट्विट करून आपला संताप व्यक्त केला.