ओडिशात दिसला `दुर्मिळ` वाघ, VIDEO होतोय प्रचंड व्हायरल
1773 साली असा वाघ दिसला होता, त्यानंतर `या` प्रजातीच्या वाघाचे दर्शनच झालं नाही, पाहा VIDEO
ओडिशा : जगभरात दुर्मिळ वन्य प्राणी पाहिल्या गेल्याच्या अनेक घटना घडत असतात. असाच एक दुर्मिळ प्राणी पाहिल्याची घटना देशात घडली आहे. हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसुन वाघ आहे. या दुर्मिळ वाघाबाबत असेही बोलले जातेय की, हा वाघ 1773 साली शेवटचा दिसला होता.त्यानंतर असा वाघ दिसलाच नव्हता असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता या दुर्मिळ वाघाबाबतची कुतूहलता आणखीणच वाढली आहे.
सोशल मीडियावर वाघाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक 'दुर्मिळ' वाघ दिसत आहे, जो काळ्या रंगाचा आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ओडिशा व्याघ्र प्रकल्पाचा आहे. जिथे एक 'अत्यंत दुर्मिळ' काळ्या रंगाचा वाघ दिसत आहे. हा काळ्या रंगाचा वाघ कसा आपला प्रदेश खुणावत आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 1773 पासून काळा वाघ दिसल्याचा दावा केला जात आहे. 1950 मध्ये चीनमध्ये आणि 1913 मध्ये म्यानमारमध्ये असेच दावे करण्यात आले होते.
हा व्हिडिओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ 29 जुलै रोजी शेअर करण्यात आला होता. जो आतापर्यंत 35 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर यूजर्स प्रतिक्रिया देत आहेत.