भारतात सापडला दुर्मीळ ब्लडग्रुप, जगात `या` ब्लडग्रुपची केवळ 10 माणसं
आता अजून एका दुर्मीळ रक्तगटाचा शोध लागला आहे.
Trending News: आतापर्यंत आपल्याला रक्ताचे चार गट माहिती आहेत, ते म्हणजे A, B, O आणि AB. पण आता अजून एका दुर्मीळ रक्तगटाचा शोध लागला आहे. हो, तुम्ही बरोबर वाचत आहात. दुर्मीळ रक्तगट आढळला आहे तो पण आपल्या भारतात.
कुठे सापडला हा दुर्मीळ रक्तगट
गुजरातमधील राजकोटच्या 65 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात हे दुर्मीळ रक्त असल्याचं समजलं आहे. या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास आहे. ऐतिहासिक गोष्ट म्हणजे दुर्मीळ रक्तगट असलेला हा भारताचा पहिला आणि जगातील 10 व्यक्ती आहे. याचा अर्थ असा की EMM Negative रक्तगट असणारे जगात फक्त 10 व्यक्ती आहेत.
शरीरात 42 ब्लड सिस्टम्स
आपल्या शरीरात 42 वेगवेगळे प्रकारचे ब्लड सिस्टम्स असतात. ज्यात A, B, O, RH आणि डफी (Duffy) असं वेगवेगळे प्रकार असतात. मात्र साधारणत: 4 रक्तगट मानले जातात. तर EMM Negative हा रक्तगट 42 वा ग्रुप सिस्टम्स आहे. हा रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना ईएमएम हाय फिक्वेन्सी अँटिजनची कमतरता असते. विशेष म्हणजे या रक्तगटाचे लोकं ना रक्तदान करु शकतात आणि ना यांना दुसऱ्या कुठलाही रक्तगटाचे रक्त चालतं.
कसा सापडला हा रक्तगट?
सुरतमधील या रुग्णाला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे या रुग्णाची हार्ट सर्जरी करायची होती. मात्र या सर्जरीसाठी त्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासली. म्हणून त्याचा रक्ताची तपासणी केल्यावर या ईएमएम निगेटिव ब्लड ग्रुप अशा दुर्मीळ रक्तगटाची माहिती मिळाली.