Ratan Tata यांना कशी मिळालेली पहिली नोकरी? पहिल्या Resume चा किस्साही रंजक
Ratan Tata Demise : रतन टाटा यांच्या उद्योगसमुहानं अनेकांना रोजगार मिळवून दिला. पण, खुद्द रतन टाटा यांना पहिली नोकरी कशी मिळाली माहितीये?
Ratan Tata Demise : भारतातील ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समुहाचे मानद अध्यक्ष असणाऱ्या रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. जनसामान्यांमध्ये कमालीचा आदर आणि आपुलकी मिळवणाऱ्या रतन टाटा यांचा दानशूरपणाही सर्वज्ञात होता. अशा या रतन टाटांच्या गतजीवनातील काही किस्से आणि प्रसंग आजही सर्वांच्याच चर्चेत असताच. किंबहुना जेव्हाजेव्हा टाटांचा उल्लेख होतो, तेव्हातेव्हा त्यांच्या या आठवणींना उजाळाही दिला जातो. (Ratan Tata job)
कॉर्नेल युनिवर्सिटीतील कॉर्नेल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग इथून त्यांनी बीएससी आर्किटेक्चरची पदवी मिळवली होती. यानंतर काही दिवस लॉस एन्जेलिसमध्ये जोन्स अँड एमोससोबत काही महिने काम केल्यानंतर त्यांनी 1962 मध्ये भारतात येत नवी कारकिर्द सुरू केली. एका मुलाखतीदरम्यान टाटांनी एक किस्सा सांगितला होता जिथं त्यांना IBM मध्ये नोकरी मिळाल्याचं सांगितलं गेलं. पण, त्यांचे काका आणि मार्गदर्श जेआरडी टाटा यांना मात्र ही नोकरी पडली नव्हती. त्यांनी रतन टाटा याना बायोडेटा शेअर करण्यास सांगितलं आणि त्यांना चाचा समुहासोबतच काम करण्यास सांगितलं. पण, त्यांच्याकडे कोणताच बायोडेटा आला नव्हता.
रतन टाटांनी कसा बनवला रिझ्यूमे...
आजीची प्रकृती खालावल्यामुळं रतन टाटा भारतात परतले आणि त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आणि त्यांना नोकरीचा प्रस्तावही मिळाला. याविषयी सांगताना टाटा म्हणाले, 'जेआरडींनी मला एक फोन केला आणि त्यांनी फोन तू आयबीएमसाठी काम करु शकत नाहीस असं सांगितलं. त्यावेळी मी आयबीएमच्या ऑफिसमध्येच होतो. मला आठवतंय ती त्यांनी माझ्याकडे रेझ्युमे मागवला होता. पण, तेव्हा माझ्याकडे रेझ्यूमे नव्हता. ऑफिसमध्ये तेव्हा इलेक्ट्रॉनिक टाईपराईटर होते. त्यामुळं एके दिवशी मी रेझ्यूमे टाईप केला आणि जेआरडींना पाठवला' हा तोच क्षण होता जेव्हा रतन टाटा यांना टाटा समुहात नोकरी मिळाली.
हेसुद्धा वाचा : रतन टाटा म्हणजे Inspiration! त्यांचे हे Quotes तुम्हाला आयुष्यभर देतील प्रेरणा
जेआरडींना रेझ्यूमे पाठवल्यानंतर रतन टाटा यांना टाटा समुहाची प्रमोटर कंपनी असणाऱ्या टाटा इंडस्ट्रीजमध्ये नोकरी मिळाली. यानंतर 1963 मध्ये टिक्सो म्हणजेच आताची टाटा स्टील, तत्पूर्वी टेल्को आताची टाटा मोट्स या कंपन्यांमध्ये काम केलं. प्रत्येक संधीनं रतन टाटा यांच्यासाठी प्रगतीची नवी कवाडं खुली केली आणि हा समुह अग्रस्थानी पोहोचला.
सूत्रांच्या माहितीनुसार रतन टाटा यांनी टाटा समुहातील त्यांची कारकिर्द जमशेदपूर येथील स्टील फॅक्ट्रीतून केली होती. इथं त्यांनी सहा वर्षे काम केलं. रतन टाटा आणि टाटा समुह हे एक अतुट नातं असून, हे नातं कायमच सर्वांच्या स्मरणात राहील असं म्हणणं गैर नाही.